मुंबई-गोवा ‘शिवशाही’ कायमस्वरुपी धावणार; किती असेल तिकीट?

डिसेंबरमध्ये बहुतांश नागरिक गोव्याची वाट धरतात. प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीमुळे अनेकदा ट्रेनचे तिकीट उपलब्ध होत नाही तर खासगी ट्रॅव्हल्स अधिक भाडे आकारतात. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई ते पणजी या मार्गावर वातानुकूलित एसटी सेवा सुरु केली होती. त्यानंतर सुट्ट्यांचा कालावधी संपल्यानंतर ही सेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाकडून घेण्यात आला होता. परंतु प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन आता नाताळच्या सुट्टीनिमित्त सुरू केलेली मुंबई-पणजी शिवशाही कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

( हेही वाचा : पश्चिम रेल्वे मार्गावर धावणार आठवी एसी लोकल!)

मुंबई-कोकण मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित सेवांच्या तुलनेत शिवशाही सेवा सर्वात स्वस्त असल्याचे एसटी महामंडळाचे म्हणणे आहे. २ जानेवारीपासून मुंबई-पणजी शिवशाही सेवा बंद केली जाणार ही माहिती मिळताच मुंबई सेंट्रल येथील प्रवाशांनी बस पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. मुंबईसह कोकणातील प्रवाशांनी ही बस बंद करू नये अशी मागणी केली आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन आता ही सेवा कायमस्वरुपी सुरू राहणार आहे अशी माहिती MSRTC च्या अधिकृत ट्विटवरून देण्यात आली आहे.

किती असणार भाडेदर?

मुंबई-पणजी शिवशाहीचे तिकीट १ हजार २४५ रुपये आहे. गोवा परिवहन महामंडळाच्या कदंब बसचे तिकीट हे डायनॅमिक अर्थात गर्दीच्या वेळेत जास्त आणि इतर वेळी कमी असणार आहे. कदंब बसचे भाडे १२५० ते १५०० रुपये आहे. परंतु एसटी महामंडळाचे तिकीटदर कायमस्वरूपी १ हजार २४५ रुपये राहणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here