एसटीतून सामान्य नागरिकांचा होणार ‘स्मार्ट’ प्रवास! मिळणार १० टक्के सवलत, फक्त करा ‘हे’ काम

152

एसटी महामंडळाने सर्वसामान्यांसाठी स्मार्ट कार्ड सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. हे स्मार्ट कार्ड खरेदी करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासासाठी १० टक्के सवलत मिळणार असल्याची माहिची एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

( हेही वाचा : पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार! ८ जणांना अटक)

एसटी महामंडळाच्यावतीने विविध घटकांसाठी १ जून २०१९ पासून स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक, पुरस्कारप्राप्त व्यक्ती, विद्यार्थी, अंध व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक, डायलिसिस रुग्ण यासह काही घटकांना स्मार्ड कार्ड देण्यात येते.

स्मार्ट कार्डद्वारे मिळते एवढी सवलत

  • वयवर्ष ६५ ते ७५ वयाचे ज्येष्ठ नागरिक – ५० टक्के सवलत
  • ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक – १०० टक्के सवलत
  • विद्यार्थी – ६६.६७ टक्के सवलत

आता सामान्य प्रवाशांनाही सवलत 

सवलतीमुळे एसटी प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आतापर्यंत ३९ लाख ८४ हजार स्मार्ट कार्डची नोंदणी झाली असून ३३ लाख ७४ हजार ५६२ कार्डांचे वितरण करण्यात आले आहे. आता एसटी महामंडळाने सामान्य प्रवाशांसाठी दहा टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवासी आणि उत्पन्नही वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.