मागच्या तीन महिन्यांपासून चाललेला एसटी कर्मचा-यांचा संप अद्याप संपलेला नाही. त्यामुळे एसटी सेवा अजूनही पूर्वरत झालेली नसल्याने, एसटी महामंडळाने कंत्राटी चालकांची भरती सुरु केली आहे. एसटी कर्मचा-यांच्या संपाचा तिढा मिटत नसल्याने, महामंडळाने काही महिन्यांसाठी कंत्राटी पद्दतीने वाहक भरतीचा निर्णय घेतला आहे.
…म्हणून कंत्राटी चालकांची भरती
एसटीत 82 हजार 489 कर्मचारी असून, आतापर्यंत 27 हजार 985 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. 54 हजार 594 कर्मचारी अद्यापही संपात सहभागी आहेत. तसेच, 4 हजार 507 चालक हजर झाले असून, 25 हजार 83 चालक संपात सहभागी आहेत. कामावर हजर झालेल्या कर्मचा-यांमध्ये सर्वाधिक प्रशासकीय व कार्यशाळेतील कर्मचारी आहेत. मात्र, अजूनही मोठ्या प्रमाणात चालक, वाहक सेवेत आल्याशिवाय एसटी पूर्णपणे सुरळीत होऊ शकत नाही. त्यामुळे महामंडळाने मनुष्यबळ पुरवणा-या कंपन्यांकडून नुकतीच 800 कंत्राटी चालकांची भरती केली. मात्र, एसटीचे चालकच परतत नसल्याने, या संख्येतही वाढ केली जाणार असून, त्यासाठी या आठवड्यात निविदाही काढण्यात येणार आहे.
( हेही वाचा :“बेस्ट”ची बेस्ट सुविधा, एक कार्ड सर्वत्र प्रवास! वाचा काय आहे योजना?)
अद्यापही आंदोलन सुरुच
कंत्राट चालक भरती करताना, संपकरी वाहकही परतण्याचे प्रमाण कमी असल्याने, एसटी महामंडळ कंत्राटी पद्धतीने वाहक भरती करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एसटीतील एका वरिष्ठ अधिका-याने दिली. एसटीतच इलेक्ट्राॅनिक मशीन पुरवण्याचे कंत्राट दिलेले ट्रायमॅक्स कंपनीला हे काम दिलेले असून, त्यांची प्रतिक्रियाही स्पष्ट असल्याचे सांगितले.
Join Our WhatsApp Community