राज्य सरकारने पगाराचे पूर्ण पैसे न दिल्यामुळे पुढील महिन्यात कर्मचा-यांचा पगार कसा द्यायचा असा प्रश्न आता एसटी महामंडळासमोर आहे. एसटी महामंडळाला सरकारकडून 360 कोटी ऐवजी केवळ 100 कोटी रुपये निधी मिळत असल्याने उर्वरित 200 कोटी रुपये आणायचे कुठून असा प्रश्न आता महामंडळासमोर आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत एसटी कर्मचा-यांचा पगार अडचणीत आला आहे.
एसटी महामंडळाने पैसे नसल्यामुळे मागील 2 महिन्यांपासून 90 हजार कर्मचा-यांचा भविष्य निर्वाह निधीचे पैसे जमा केलेले नाहीत. एसटी महामंडळाचे उत्पन्न प्रती महिना 450 कोटी रुपये आहे. तर 650 कोटी रुपये प्रती महिना खर्च येतो. एसटी महामंडळ चालवण्यासाठी प्रति महिना पगारासाठी 310 कोटी लागतात. तर डिझेलसाठी 250 कोटी रुपयांचा खर्च येतो. तर इतर आस्थापनासाठी 90 कोटी रुपये खर्च होतात.
( हेही वाचा: याच वाघाने डरकाळी फोडल्यावर महाराष्ट्रात काय झालं हे सर्वांनी पहिलं; केसरकरांचा ठाकरेंना टोला )
Join Our WhatsApp Community