कोरोना काळात लालपरी ठप्प होती. तसेच, एसटीच्या विलीनीकरणासाठी केलेल्या आंदोलनात लालपरी एकाच जागी उभा होती. त्यामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आता एसटी कर्मचारी पुन्हा कामावर हजर होऊ लागले आहेत. त्यामुळे लालपरीची चाके पुन्हा पुर्वपदावर येत आहेत. राज्यभरातील विविध मार्गांवरील फे-या सुरु झाल्याने एसटीने 17 एप्रिलपर्यंत 134 कोटी 33 लाख कमवले आहेत.
इतके कर्मचारी कामावर रुजू
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर, आता एसटी कर्मचारी कर्तव्यावर हजर होत आहेत. सोमवारी एकाच दिवशी 15 हजार 185 कर्मचारी कामावर रुजू झाले. त्यामुळे कामावर परतलेल्या एकूण कर्मचा-यांची संख्या 61 हजार 647 झाली आहे. सध्या केवळ हजार कर्मचारी संपात सहभागी आहेत.
( हेही वाचा: वीज बिल कमी करायचंय? मग हे कराच! )
संपकाळातील वेतन नाहीच
राज्य सरकारने संपकाळात सहभागी असलेल्या कर्मचा-यांना वेतन न देण्याचा निर्णय घेतला आहे. रजेशिवाय तसेच, कोणतेही कारण न देता गैरहजर असलेल्या कालावधीसाठी वेतनावर दावा कोणालाही करता येणार नाही. या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी राज्य सरकारने केली आहे.
Join Our WhatsApp Community