ST Employee: एसटी कर्मचा-यांबाबत मोठी बातमी; पगार रखडल्याने संघटना आक्रमक

जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी एसटी कर्मचा-यांचा पगार झालेला नाही. त्यामुळे आता एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. संपादरम्यान पगारासाठी 4 वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे, तसेच कित्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखेदरम्यान वेतन देण्याचे सरकारने मान्य केले होते. मात्र ते पाळण्यात येत नसल्यामुळे 90 हजार कर्मचारी नाराज आहेत. यासंदर्भात एसटी संघटनेने महामंडळाला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करावी लागेल, अशी नोटीस बजावली आहे. सरकारकडून अपुरा आणि वेळेवर मिळत नसलेल्या निधीमुळे कर्मचा-यांचे वेतन लांबणीवर पडत असल्याचे कर्मचा-यांचे म्हणणे आहे.

( हेही वाचा: नाशिकमध्ये भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती )

सरकारला कायदेशीर मार्गाने धडा शिकवला जाईल

एसटी कर्मचा-यांनी केलेल्या संपात वेतनासाठी चार वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या 4 ते 10 तारखेदरम्यान वेतन देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीने, सरकारच्यावतीने न्यायालयात सांगितले होते. आता महिन्याची 12 तारीख उलटून गेली तरी सरकारकडून निधी न मिळाल्याने एसटी कर्मचा-यांचे पगार रखडलेले आहेत. राज्य सरकार एसटी कर्माचा-यांशी दुजाभाव करत असल्याचा आरोप करण्यात आला असून, सरकारला कायदेशीर मार्गाने धडा शिकवला जाईल, असा इशारा एसटी कर्मचारी संघटनांकडून दिला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here