एसटीच्या उत्पनात वाढ; महिनाभरात 300 कोटींची कमाई

एसटी कर्मचा-यांचा संप जवळजवळ पाच महिने सुरु होता. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर, एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले आणि अखरे लालपरी पूर्वपदावर आली आहे. कर्तव्यावर रुजू झालेले कर्मचारी आणि उपलब्ध बसगाड्यांच्या माध्यमातून एसटीने गेल्या महिनाभरात तब्बल 296 कोटी 59 लाखांची कमाई केली. सध्या राज्यात दररोज सरासरी 22 ते 24 लाख प्रवासी प्रवास करत असून, दैनंदिन सरासरी 13 ते 14 कोटींचे उत्पन्न एसटीला मिळत आहे.

सर्वसामान्यांना दिलासा

एसटी कर्मचारी कामावर परतल्यानंतर, आता अधिकाधिक फे-यांचे नियोजन आखले जात आहे. त्यानुसार एप्रिल महिन्यात एसटीने 296 कोटी 59 लाखांचे उत्पन्न मिळवले. त्यामुळे गेल्या पाच महिन्यानंतर राज्यभरातील सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

( हेही वाचा: पदवीधरांना सुवर्णसंधी; सरकारी नोकरी हवी आहे? 7 हजार जागांवर भरती )

एसटीच्या उत्पन्नात वाढ

4 ते 12 एप्रिल दरम्यान, सरासरी एसटीची दैनंदिन प्रवासी संख्या 12 लाखांच्या घरात होती. प्रवासी संख्येत हळूहळू वाढ होत ती एप्रिलअखेरपर्यंत तब्बल 23 लाखांच्या घरात पोहचली आहे. परिणामी, एसटीच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.  उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, 22 एप्रिलपासून राज्यभरातील संपकरी एसटी कर्मचारी कर्तव्यावर परतले. पाच महिन्यांच्या संपामुळे अनेक बसगाड्या नादुरुस्त असल्याने, सध्या रस्त्यावर धावणा-या एसटींची संख्या कमी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here