एसटी महामंडळाने मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवरुन एसटी बसेस धावणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना लालपरीने मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवरुन प्रवास करता येणार नाही. आता फक्त मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवरुन शिवनेरी बस धावणार आहेत. एसटीच्या साध्या बसेस मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवरुन धावत असल्याने, त्याचा फटका एसटी महामंडळाला बसत आहे.
लालपरीसाठी एक्सप्रेसवे बंद
प्रवाशांची संख्या आणि टोलचा अतिरिक्त भार यामुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसत होता. यानंतर आता एसटी प्रशासनाने कठोर पावले उचलत एक्सप्रेसवेवर एसटीच्या साध्या बसला बंदी घातली आहे. मात्र जुन्या मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवरील साध्या एसटी बसेस धावत नसल्याने 30 ते 50 टक्के प्रवासी घटले असल्याची माहिती समोर आली आहे.
( हेही वाचा: औरंगजेबाने तोडलेल्या हिंदू मंदिरांची यादी देत, नितेश राणेंनी आव्हाडांचा घेतला समाचार )
एसटीच्या उत्पन्नावर परिणाम
आधी जुन्या मुंबई- पुणे हायवेवरुन साध्या एसटी बस मेगा हायवे सुरु झाल्यानंतर एक्सप्रेसवेवर धावू लागल्या. शिवनेरीसोबत साध्या बस धावू लागल्याने प्रवाशी संख्या कमी झाली आणि याचा फटका एसटीच्या उत्पन्नावर होऊ लागला. तसेच, जुन्या मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर बसला 485 रुपये टोल द्यावा लागतो. दुसरीकडे एक्सप्रेसवेवरुन जाण्यासाठी त्याच बसला रुपये 675 टोल द्यावा लागतो. त्यामुळे एका बसमागे एसटी प्रशासनाला 190 रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड भरावा लागत आहे.