अद्यापही एसटी सेवा विस्कळीत! पुन्हा संपकरी कर्मचा-यांवर उभारला जाणार कारवाईचा बडगा

154

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणार नाही. असा त्रिसदस्यीय समितीने निर्णय दिल्यानंतरही अद्याप एसटी कर्मचा-यांचा संप संपलेला नाही. एसटी कर्मचा-यांना 31 मार्चपर्यंत कामावर परतण्याचे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. पण असे असूनही अद्याप 49 हजार कर्मचारी  संपावर आहेत. त्यामुळे एसटी सेवा अजूनही विस्कळीत आहे, म्हणून दोन दिवसांत कामावर न येणा-या कर्मचा-यांवर कारवाई केली जाणार असल्याचे परब यांनी स्पष्ट केले आहे.

काही भागांत अद्यापही एसटी सेवा बंद

28 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचा-यांनी संप पुकारला आहे. त्यानंतर विलीनीकरण शक्य नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. एसटी कर्मचा-यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहनही करण्यात आले. पण अजूनही 49 हजार कर्मचारी संपावर आहेत. एसटी कर्मचा-यांची एकूण संख्या 81 हजार 683 असून, यातील 32 हजार 652 कर्मचारी कर्तव्यावर हजर आहेत. तर अद्यापही 49 हजार 331 कर्मचारी संपात सहभागी आहेत. यात चालक- वाहकांची संख्या 41 हजार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत एसटी सेवा अद्यापही सुरु झालेली नाही. सध्या दिवसाला 11 लाख प्रवासी प्रवास करत आहेत.

( हेही वाचा: मोठी बातमी! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत )

10 हजारहून अधिक बडतर्फ

एसटीतील 12 हजार 596 हून अधिक कर्मचा-यांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली असून, 10 हजार 275 हून अधिक कर्माचा-यांना बडतर्फ करण्यात आले आहे. या कर्मचा-यांना 31 मार्चपर्यंत कामावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर निलंबन, बडतर्फी या कारवाया थांबवल्या होत्या. आता त्या पुन्हा सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.