एसटी बंद, प्रवाशांचे हाल, खासगी वाहनधारक मात्र मालामाल!

146

एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरूच आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढी संदर्भात घोषणा करूनही अद्यापही कर्मचारी वर्ग कामावर रुजू झालेला नाही. या संपकाळात एसटी आगार सुरू झाले असले, तरीही एसटीच्या फेऱ्या बंद आहेत. लालपरीची नाळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याशी जुळली आहे. एसटी बंद झाल्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. यामुळे हजारो प्रवाशांनी आता खासगी ट्रॅव्हल्सची वाट धरली आहे. त्याचा नेहमीप्रमाणे ट्रॅव्हल्सवाल्यांनी गैरफायदा उचलण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे एकदा खरेदी केलेले तिकीट पुन्हा रद्द करता येणार नाही, अशी दटावणी करूनच ट्रॅव्हल्सवाले तिकिटांचे आरक्षण करू लागले आहेत.

( हेही वाचा : चालू हंगामातील पहिला आंबा पोहोचला मुंबईत… )

प्रवाशांचे हाल

पनवेल एसटी बसस्थानकातही खासगी वाहनधारक मनमानी करत आहेत. पनवेलपासून महाड, माणगावसाठी मराठी माणसांकडून ३०० रुपये घेतले जातात, तर परप्रांतीयांना ४०० रुपये तिकीट भाडे आकारण्यात येते. शासकीय दरानुसार बसभाडे ठरवा, अशा सूचना देऊनही हे खासगी वाहनधारक जास्तीचे भाडे घेतात, असे अनेक प्रवाशांनी सांगितले आहे. आठवडाभरापासून अलिबाग, पेण, महाड मार्गावर ५ एसटी सुरू झाल्या आहेत. मात्र एसटीच्या कमी फेऱ्या असल्यामुळे त्याचा फायदा खासगी वाहनधारकांना झाला आहे. संप काळात दोन महिन्यांपासून एसटी बंद असल्याने खासगी वाहनधारकांची मनमानी वाढली आहे.

( हेही वाचा : १०वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीत सुवर्ण संधी! २,७८८ रिक्त… )

महामंडळाचा निर्णय

एसटी बंद असल्यामुळे खासगी वाहनचालकांना फायदा होत असून प्रवाशांना मात्र मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. खासगी वाहनचालक अवाढव्य दर आकारत असल्याने एसटी लवकरात लवकर चालू करावी, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत निवृत्त कर्मचाऱ्यांना परत कामावर बोलावले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.