गळक्या गाड्यांचे एसटीपुढे आव्हान

कोरोना आणि संपकाळानंतर राज्यभरात एसटीची सेवा पूर्वपदावर आली आहे, मात्र या काळात अनेक बसगाड्या नादुरुस्त झाल्या. दुरुस्ती करुन एसटीच्या बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत सेवेत दाखल झाल्या; मात्र अनेक गाड्या ऐनरस्त्यात बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच, पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून गळक्या गाड्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश एसटी प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे गळक्या गाड्या दुरुस्तीचे मोठे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे.

प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याचे आव्हान 

एप्रिल महिन्यापासून राज्यातील एसटीची सेवा सुरळीत सुरु झाली आहे. प्रवासी संख्येबरोबरच एसटीच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. मात्र एसटीच्या गळक्या बसगाड्यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. एकूण 18 हजार बसगाड्यांपैकी सध्या 13 हजार गाड्या राज्यभरात रस्त्यावर धावत आहेत. प्रवाशांना टिकवून ठेवण्यासाठी आता एसटी प्रशासनापुढे गळक्या आणि नादुरुस्त गाड्या दुरुस्त करुन प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याचे आव्हान आहे.

( हेही वाचा :एकनाथ शिंदे देणार मंत्रिपदाचा राजीनामा? )

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here