एसटी प्रवासात सु्ट्ट्या पैशांवरुन होणारे वाद आता संपणार; ‘एसटी’ ची नवी सुविधा

एसटी प्रवासात सुट्ट्या पैशावरुन प्रवासी व वाहकात होणारे वाद आता कायमचे संपतील. कारण राज्य परिवहन महामंडळाने सुमारे पाच हजार नव्या स्वाईप मशिनची खरेदी केली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता फोन पे, गुगल पे आदी युपीआयद्वारे तिकीट काढता येणार आहे. पहिल्या टप्प्यात सात एसटी विभागांना नवे स्वाईप मशिन देण्यात आले. जुलै महिन्यात उर्वरित विभागांना देण्यात येणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांना रोख रक्कम जवळ न बाळगतादेखील एसटी प्रवास करता येणार आहे.

एसटी प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी स्वाईप मशिनद्वारे तिकीट देण्याची पद्धत सुरु केली. मात्र, त्यावेळी केवळ डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे तिकीट दिले जात होते. यात देखील अडचणी येत होत्या. अनेकदा मशिन बंद पडायच्या. त्यामुळे एसटी प्रशासनाने नव्या प्रणालीत आवश्यक तो बदल केला आहे. पूर्वीच्या तुलनेने ही प्रणाली अद्ययावत झाली आहे. नव्या मशिनमध्ये युपीआयची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना फोन पे द्वारे देखील तिकीट काढता येणार आहे.

( हेही वाचा: शिवसेनेच्या संकटकाळात काँग्रेस-राष्ट्रवादीचा स्वार्थी कारभार! अध्यादेशांचा ‘पाऊस’ मुसळधार )

सात विभागांचा समावेश

  • एसटी प्रशासनातर्फे पहिल्या टप्प्यात सात विभागांत सेवा
  • यात लातूर, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, चंद्रपूर व भंडारा या विभागांचा समावेश
  • राज्यातील उर्वरित विभागांत जुलै महिन्यांत नवे मशिन उपलब्ध
  • वाहकांना विशेष प्रशिक्षण
  • नव्या स्वाईप मशिन क्यूआर कोडचा समावेश
  • त्याद्वारे प्रवाशांना तिकीट दिले जाणार

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here