विनातिकीट प्रवाशांविरोधात एसटीची तपासणी मोहीम

एसटी महामंडळाने एसटीमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात तपासणी मोहीम सुरू केली आहे. मोहिमेदरम्यान विनातिकीट प्रवासी आढळल्यास संबंधितांकडून चुकवलेल्या भाड्याव्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम वसूल करण्यात येणार आहे. हा दंड टाळण्यासाठी प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

या काळात राबवणार मोहीम

प्रवाशांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी व विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ (१५ दिवस) या कालावधी दरम्यान एसटी महामंडळ तिकीट तपासणी मोहीम राबवणार आहे. या मोहिमेत विभागातील मार्ग तपासणी पथकातील व आगारातील सर्व पर्यवेक्षकीय कर्मचा-यांचाही समावेश केला जाणार आहे. हे सर्व अधिकारी विनातिकीट प्रवाशांविरोधात तपासणी मोहीम राबवणार आहेत.

(हेही वाचाः रडगाणे सुरुच… एसटी कर्मचाऱ्यांना वेतनासाठी पुन्हा मिळणार ‘थांबा’?)

महामंडळातर्फे प्रवाशांना आवाहन

यावेळी विनातिकीट प्रवास करताना प्रवासी आढळल्यास त्यांच्याकडून प्रवासादरम्यान लागणा-या एकूण भाड्याव्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा रुपये १०० यापैकी जी रक्कम अधिक असेल ती दंड म्हणून वसूल करण्यात येईल. त्यामुळे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये. तसेच आपले तिकीट काळजीपूर्वक जपून ठेवावे, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

एक प्रतिक्रिया

 1. नमस्कार…

  आताच एक बातमी वाचली की एस.टी.चे
  तपासणी मोहीमेत नऊ दिवसात अवघे १६ प्रवासी विना तिकीट सापडले. .अगदी नगण्य संख्या आहे ही परंतु साहेब यासाठी महामंडळाला कीतीतरी डीझेल
  खर्च करावे लागले..कीतीतरी मनुष्यबळ
  खर्च करावे लागले आहे आणी सध्याच्या
  काळात हा खर्च परवडणारा नाही दुसरी
  गोष्ट सध्याचा प्रवासी सुशिक्षित व जागरूक असल्याने तोच विना तिकीट
  फीरण्याचे प्रमाण कमी आहे..जर का
  बसच्या आतील दर्शनी बाजूवर ठळक
  अक्षरात *प्रवासी तिकीट म्हणजे प्रवासी विमा आहे ते मागून घ्या जपून ठेवा ते प्रवासी म्हणून तुमच्या फायद्याचे आहे* अशी सुचना प्रदर्शित
  केली तर ही नगण्य संख्या सुध्दा संपेल
  आणी स्वतंत्रपणे गाडी देऊन तपासणी
  कार्यक्रम थांबून महामंडळाचा खर्च सुध्दा
  वाचेल..फारतर प्रत्येक मार्गावर स्वतंत्र
  तपासणी पथक रोज वेगवेगळ्या स्टाॅपवर
  ठेवावे त्यासाठी त्यांना गाडी देण्याची गरज
  नसेल ते पथक मार्गावरील बस मधूनच
  जातील आणी कामकाज करतील..याने
  डीझेलचा मोठा खर्च वाचेल. आणी काम
  सुध्दा होईल…आणी कर्मचारीचे मध्ये
  दहशत सुध्दा होईल..
  मी पाहीले आहे की बरेचदा वरीष्ठ
  अधिकारी तपासणी प्रोग्राम लावून
  आपल्या गावी जातात महामंडळाच्या
  खर्चाने..मुंबई मध्ये उड्डाणपूला वरून
  येणारे वाहनांना पकडण्यासाठी अधिकारी
  लोक उभे असतात पुलाच्या पुढच्या बाजूला..त्याचा उपयोग शुन्य असतो
  फायदा एकच एक केस मिळते पण मुळ
  उद्देशाला हरताळ फासला जातो आपला
  मुळ उद्देश आहे की बस पुलाखालून गेली
  पाहीजे आणी हे आदेश कर्मचारीनी पाळले पाहीजेत तर मग तपासणी पथक
  पुलाच्या सुरवातीस उभे राहीले पाहीजे
  म्हणजे जे वाहन पुलावरून जाण्याचे
  तयारीत असेल ते वाहन आपोआपच
  पुलाखालून जाईल..पण इथे तपासणी
  पथकाचा हा उद्देशच नसतो त्यांचा उद्देश
  फक्त…केस मिळवणे ऐवढाच असतो

  वरीलप्रमाणे सुचना आहेत योग्य असतील
  तर बदल व्हावेत अशी विनंती आहे

  मिलिंद काटकर चिपळूण आगार

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here