विनातिकीट प्रवाशांविरोधात एसटीची तपासणी मोहीम

126

एसटी महामंडळाने एसटीमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात तपासणी मोहीम सुरू केली आहे. मोहिमेदरम्यान विनातिकीट प्रवासी आढळल्यास संबंधितांकडून चुकवलेल्या भाड्याव्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम वसूल करण्यात येणार आहे. हा दंड टाळण्यासाठी प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

या काळात राबवणार मोहीम

प्रवाशांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी व विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ (१५ दिवस) या कालावधी दरम्यान एसटी महामंडळ तिकीट तपासणी मोहीम राबवणार आहे. या मोहिमेत विभागातील मार्ग तपासणी पथकातील व आगारातील सर्व पर्यवेक्षकीय कर्मचा-यांचाही समावेश केला जाणार आहे. हे सर्व अधिकारी विनातिकीट प्रवाशांविरोधात तपासणी मोहीम राबवणार आहेत.

(हेही वाचाः रडगाणे सुरुच… एसटी कर्मचाऱ्यांना वेतनासाठी पुन्हा मिळणार ‘थांबा’?)

महामंडळातर्फे प्रवाशांना आवाहन

यावेळी विनातिकीट प्रवास करताना प्रवासी आढळल्यास त्यांच्याकडून प्रवासादरम्यान लागणा-या एकूण भाड्याव्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा रुपये १०० यापैकी जी रक्कम अधिक असेल ती दंड म्हणून वसूल करण्यात येईल. त्यामुळे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये. तसेच आपले तिकीट काळजीपूर्वक जपून ठेवावे, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.