कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खुशखबर! १ हजार एसटी गाड्यांचे नियोजन

158

गणेशोत्सवाकरिता कोकणाच जाणाऱ्या नागरिकांसाठी एसटी महामंडळाने विशेष २५०० गाड्यांचे नियोजन केले आहे. यातील एसटी महामंडळाच्या ठाणे विभागातून एक हजार गाड्या सोडण्यात येणार आहेत. ठाणे, बोरिवली, भाईंदर, कल्याण-डोबिंवली अशा विविध भागांमधून या जादा बस सोडण्यात येणार आहेत. यासाठी आरक्षण प्रक्रिया सुरू झाली असून २ जुलैपर्यंत ही नोंदणी सुरू असणार आहे. अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने दिली आहे.

( हेही वाचा : MSRTC : एसटीचे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ)

१ हजार १ एसटी गाड्यांचे नियोजन

गणेशोत्सवासाठी मुंबईकर चाकरमानी कोकणाची वाट धरतात. दरवर्षी या कालावधीत रेल्वे प्रशासन आणि राज्य परिवहन महामंडळाकडून विशेष बसगाड्या सोडण्यात येतात. यंदा ३१ ऑगस्टपासून गणेशोत्वासाला सुरूवात होत आहे. यासाठी महामंडळाच्या ठाणे विभागाने २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान कोकणात जाण्यासाठी १ हजार १ जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. २८ आणि २९ ऑगस्टला कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता लक्षात घेऊन २८ ऑगस्टला ३२७ आणि २९ ऑगस्टला ५६४ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सामुहिक आरक्षण नोंदणीला १ जुलैपासून सुरूवात होणार आहे. परतीच्या प्रवासासाठी सुद्धा विशेष गाड्यांचे सोडण्यात येणार आहेत.

या मार्गावर धावणार गाड्या 

महाड, अलिबाग, इंदापूर, चिपळूण, रत्नागिरी, गुहागर, साखरपा, देवगड, कणकवली, सावंतवाडी, सिंधुदुर्ग या मार्गावर या गाड्या सोडण्यात येणार आहेत अशी माहिती एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाने दिली आहे, आगारात जाऊन किंवा ऑनलाईन संकेस्थळ, मोबाईल अ‍ॅपद्वारे तुम्ही आरक्षण करू शकता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.