ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत देवदर्शन; ‘एसटी’ महामंडळ लवकरच सुरू करणार नवी सुविधा

100

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी शिंदे-फडणवीस मोठा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी ७५ वर्षावरील नागरिकांना राज्य सरकारने एसटीतून मोफत प्रवाससेवा देण्यास सुरू केली. त्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून राज्यभरात मोफत देवदर्शनाची सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. एसटी महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन करता यावे यासाठी या मेगाप्लॅन आखला जात आहे.

( हेही वाचा : नेपाळ विमान अपघातापूर्वीचे फेसबुक लाईव्ह…व्हिडिओ होतोय व्हायरल! चित्तथरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद)

ज्येष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन या मेगाप्लॅनसाठी मुख्यमंत्र्यांना एसटी महामंडळाची साथ लाभणार आहे. राज्यात १ कोटींच्या जवळपास ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. या नागरिकांना देवदर्शन करून आणण्यासाठी तब्बल २ हजार गाड्यांचे नियोजन करण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे.

या नवनव्या योजनांचा एसटी महामंडळाला निश्चितच फायदा होणार आहे. सध्या महाराष्ट्रात ६५ वर्षावरील नागरिकांना तिकीच दराक ५० टक्के सवलत मिळते तर ७५ वर्षीय नागरिकांना मोफत प्रवास करता येतो. मात्र आता मोफत देवदर्शनाच्या योजनेत सर्वच ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे.

मोफत देवदर्शन योजना कशी असेल?

  • मोफत देवदर्शन या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना अष्टविनायक, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, कोल्हापूर, शिर्डी, शेगाव, ज्योतिबा या देवस्थानांना जाता येणार आहे.
  • केवळ शनिवारी – रविवारी ही सुविधा ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येईल.
  • स्थानिक डेपोमधून प्रवाशांना या सहलीसाठी नोंदणी करावी लागणार आहे.
  • राहण्या-खाण्याची व्यवस्था संबंधित देवस्थानामार्फत करण्यात येईल अन्यथा प्रवाशांना स्वत:चा खर्च करावा लागणार आहे. धर्मशाळा, राखीव निवासात खोल्या राखीव ठेवण्यात येणार आहेत. यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात निश्चित वाढ होईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.