एसटी महामंडळात रुजू होण्यासाठी महिलांना करावी लागणार आणखी प्रतिक्षा!

156

एसटी महामंडळात चालक म्हणून महिला आहेतच, पण 215 महिला या चालक आणि वाहक म्हणून पहिल्यांदाच रुजू होणार होत्या. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली होती, पण कोरोना काळात घालण्यात आलेले निर्बंध, तसेच एसटी कर्मचा-यांचा चाललेला संप या सगळ्यात महिला कर्मचा-यांना कामावर रुजू होण्यासाठी आणखी एक वर्ष प्रतिक्षा करावी लागणार आहे.

म्हणून प्रशिक्षण थांबले

आदिवासी आणि दुष्काळग्रस्त भागातील महिलांना चालक आणि वाहक म्हणून एसटी महामंडळाने घेण्याच निर्णय घेतला होता. 2019 मध्ये या भरती प्रक्रियेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आलेल्या अर्जाच्या आधारे 194 महिलांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या या महिलांमध्ये 21 आदिवासी महिलांचाही समावेश होता. या महिलांना प्रशिक्षण देऊन, 2021 पर्यंत भरती करण्यात येणार होते. पण, 2020 मध्ये कोरोनामुळे टाळेबंदी लागली आणि त्यात प्रशिक्षणच थांबले. त्यामुळे आता या 215 महिलांना सेवेत येण्यासाठी आणखी वर्षभर प्रतिक्षा करावी लागणार आहे.

( हेही वाचा: एसटीच्या विलीनीकरणावर ठाम! पुन्हा एकदा संपकऱ्यांचा आझाद मैदानात एल्गार! )

प्रतिभाताईंच्या हस्ते सुरुवात

प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 23 ऑगस्ट 2019 ला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला होता. या महिलांकडे हलक्या वाहनांचा परवाना आहे. एसटी चालवण्यासाठी अवजड वाहन परवाना आवश्यक असतो. तात्पुरता त्यांचा अवजड वाहनांचा परवाना काढून त्यांना प्रशिक्षण देण्यात येत होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.