राज्य परिवहन महामंडळाच्या संपकरी कामगारांनी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी सध्या वकील गुणरत्न सदावर्ते हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. यावर न्यायालयात सुनावणी झाली आहे. त्यांच्यावर नवनवीन गुन्हे दाखल होत आहेत, त्यामध्ये कामगारांकडून २ कोटींहून अधिक रकम वसूल करण्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. आता पोलीस त्या पैशातून सदावर्ते यांनी कोणकोणती मालमत्ता खरेदी केली याचा शोध घेत आहेत. तशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात दिली, त्यामुळे सदावर्ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
घरात पैसे मोजण्याची मशीन सापडल्याने खळबळ
मुंबई पोलिसांच्या कोठडीत चार दिवस काढल्यानंतर सदावर्ते यांना सातारा पोलिसांच्या कोठडीत जावे लागले, तिथे चार दिवस काढल्यानंतर यांचा अकोट पोलीस ताबा घेण्याच्या प्रयत्नात आहेत. तिथे सदावर्ते यांच्याविरोधात एसटी कामगारांना फसवून पैसे जमावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यातच सदावर्ते यांच्या घरात पैसे मोजण्याची मशीन सापडली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. न्यायालयात सरकारी वकील घरत यांनी सदावर्ते पोलीस चौकशीत सहकार्य करत नाही, ते स्वतःचा मोबाईल द्यायला तयार नाहीत, असेही म्हटले आहे.
(हेही वाचा जयश्री पाटलांनी मारली थोबडीत! व्हिडीओ व्हायरल)
सदावर्ते यांनी कुठे आणि किती मालमत्ता घेतल्याचा आरोप?
- परळ येथे ६० लाख रुपयांत जागा खरेदी केली
- भायखळ्यामध्ये मालमत्ता खरेदी केली
- नवीन चारचाकी गाडी खरेदी केली