बडतर्फ संपकरी एसटी कर्मचारी म्हणतायत ‘कामावर घ्या’, पण…

प्रातिनिधीक छायाचित्र

मागील अडीच महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी हे बेमुदत संपावर आहेत. त्यामुळे राज्य सरकारने अखेर महामंडळाच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरु केली आहे. परिणामी आता या कर्मचाऱ्यांना उपरती येऊ लागली आहे. या कामगारांनी पुन्हा कामावर रुजू करण्यात यावे, अशी विनंती करायला सुरुवात केली आहे. मात्र महामंडळाने त्याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण स्वीकारले असल्यामुळे कर्मचाऱ्यांची कोंडी झाली आहे.

७८३ कर्मचारी बडतर्फ

गेल्या ७० दिवसांपासून संपावर गेलेल्या एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांपैकी साडेदहा हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतच्या सुनावण्यांना हजर न राहिल्याने ७८३ कर्मचारी बडतर्फ झाले आहेत. विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना वारंवार आवाहन करूनही ते रुजू न झाल्याने एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने शिस्त आवेदन कार्यपद्धतीनुसार निलंबित कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू केली आहे.

(हेही वाचा जानेवारीपासून बेस्ट मार्गात ‘असे’ होणार बदल! जाणून घ्या…)

विनंती फेटाळली जातेय 

या कारवाईनंतर अनेक कर्मचाऱ्यांनी आगारात जाऊन रुजू करून घेण्याची विनंती करण्यास सुरूवात केली आहे. मात्र मध्यवर्ती कार्यालयाने याबाबतची सूचना दिली नसल्याने आगारप्रमुखांनी त्यांना रुजू करून घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची नोकरी गेल्यात जमा झाली आहे. वारंवार आवाहन करूनही कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाची कारवाई सुरूच आहे. आतापर्यंत ११,००८ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून ७८३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे, तर २०४७ एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here