कार्तिकी वारी : एसटीचा संप रेल्वेचा मात्र दिलासा

132

राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कार्तिकी यात्रा अडचणीत सापडली होती. आधीच २०२० साली कोरोनामुळे खंड पडला, आता एसटीच्या संपांमुळे पंढरपुरात पोहचायचे कसे, असा प्रश्न वारकरी बांधवांना पडला होता, आता त्यांना रेल्वेने दिलासा दिला आहे. पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीनिमित्त होणाऱ्या जत्रेत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लातूर – पंढरपूर, पंढरपूर – मिरज आणि लातूर – मिरज दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालविणार आहे.

कोणत्या गाड्या धावणार?

लातूर – पंढरपूर विशेष (8 फेऱ्या)

  • गाडी क्र. 01281 अनारक्षित विशेष ट्रेन 12.11.2021, 15.11. 2021, 16. 11. 2021 आणि 17.11. 2021 रोजी लातूर येथून 07.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 11.30 वाजता पंढरपूर येथे पोहोचेल.
  • गाडी क्र. 01282 अनारक्षित विशेष 12.11.2021,15.11. 2021, 16. 11. 2021 आणि 17.11. 2021 रोजी 14.00 वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि त्याच दिवशी 17.30 वाजता लातूर येथे पोहोचेल.
  • थांबे – हरंगुळ, औसा, ढोकी, येडशी, उस्मानाबाद, बार्शी टाउन, कुर्डुवाडी आणि मोडलिंब.
  • संरचना – 6 शयनयान आणि 6 द्वितीय आसन श्रेणी.

(हेही वाचा : विधान परिषदेसाठी सेना – युवा सेनेत रस्सीखेच)

पंढरपूर – मिरज विशेष (6 फेऱ्या)

  • ट्रेन क्रमांक 01283 (अनारक्षित विशेष) – 13.11. 2021,15. 11. 2021 आणि 16. 11. 2021 रोजी 10.10 वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी 13.10 वाजता पोहोचेल.
  • ट्रेन क्रमांक 01284 (अनारक्षित विशेष) – 13.11.2021, 15.11. 2021 आणि 16. 11. 2021 रोजी 13.35 वाजता मिरज येथून सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी 15.45 वाजता पोहोचेल.
  • थांबे – सांगोला, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सलगरे आणि अरग.
  • गाड्यांची रचना – 6 शयनयान आणि 6 द्वितीय आसन श्रेणी.

लातूर – मिरज विशेष दैनिक (12 फेऱ्या)

  • ट्रेन क्र. 01285 (अनारक्षित विशेष) – 12.11.2021 ते 17.11. 2021पर्यंत दररोज 09.35 वाजता लातूर येथून सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी 17.00 वाजता पोहोचेल.
  • ट्रेन क्रमांक 01286 (अनारक्षित विशेष) – 12.11.2021 ते 17.11. 2021 पर्यंत दररोज 20.30 वाजता मिरज येथून सुटेल आणि लातूर येथे दुसऱ्या दिवशी 03.30 वाजता पोहोचेल.
  • थांबे – हरंगुळ, औसा, ढोकी, येडशी, उस्मानाबाद, बार्शी टाउन, कुर्डुवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सलगरे आणि अरग.
  • गाड्यांची रचना – 14 द्वितीय आसन श्रेणी.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.