Msrtc Workers: सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी शोले स्टाईल आंदोलन; 48 तास उलटूनही तोडगा नाही

55
Msrtc Workers: सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी शोले स्टाईल आंदोलन; 48 तास उलटूनही तोडगा नाही
Msrtc Workers: सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी शोले स्टाईल आंदोलन; 48 तास उलटूनही तोडगा नाही

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना (Msrtc Workers) सातवा वेतन आयोग लागू (Seventh Pay Commission) करावा, एसटीचे खाजगीकरण करू नये या मागण्यांसाठी कळंब आगारात (Kalamba ST Stand) कार्यरत असलेले वाहक सच्चिदानंद पुरी (Conductor Satchidananda Puri) यांनी आंदोलन सुरू केले आहे. भारत संचार निगमच्या टॉवर हा जमिनीपासून तब्बल दोनशे फुटांपेक्षा जास्त उंचीवर असून तेथे आंदोलन सुरू केले आहे. मात्र, मुख्यमंत्री यांनी संवाद साधला तरच आंदोलन मागे घेणार असल्याची भूमिका आंदोलक पुरी यांनी घेतली आहे. त्यामुळे प्रशासक सुध्दा हाताश झाले आहे. (Msrtc Workers)

(हेही वाचा – T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकाच्या वेळापत्रकावर माजी खेळाडूंची टीका)

या ठिकाणी महसूल कर्मचारी ठाण मांडून आहेत. याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे एक पथक आंदोलनस्थळी सज्ज आहे. कोणताही तोडगा निघाला नसल्याने केवळ एसटी महामंडळच नाही तर महसूल, नगर परिषद, पोलिस, आरोग्य, भारत संचार निगम अशा विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचारी याठिकाणी तळ ठोकून आहेत. टॉवर वरती चढून सच्चिदानंद पुरी यांचा साधारण 48 तासापेक्षा जास्त कालावधीत उलटून गेला आहे. तरी सुध्दा आद्यापही तोडगा निघालेला नाही. (Msrtc Workers)

(हेही वाचा – ‘नीट’ परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्नशील; DCM Ajit Pawar यांची विधानसभेत माहिती )

पाठिंबा म्हणुन बस सेवा बंद

सच्चिदानंद पुरी यांच्या आत्मक्लेश व अमरण उपोष) अंदोलनाची सरकार ने दखल घेतलेली नाही म्हणून आता कळंब आगारातील वाहक व चालक या अंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून बस सेवा बंद केली आहे. त्यामुळे बस सेवा बंद झाली आहे. अचानक बस सेवा बंद झाल्यामुळे प्रवासामध्ये गोंधळ उडाला आहे. अनेकांनी आगारात जाऊन बस सेवा चालू करण्याची विनंती केली होती. मात्र वाहक व चालक यांनी बस बंद चा पवित्रा घेतला आहे. (Msrtc Workers)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.