एसटी सुरु करा, नाहीतर खुर्ची खाली करा! शाळकरी मुलाची आर्त हाक

280

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे अजूनही एसटी सुरु होत नाही, असा मतप्रवाह संपकरी कामगारांमध्ये आहे. कारण एसटीचे विलीनीकरण करणे शक्य नाही, अशी ठाम भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. दुसरीकडे मागील ५ महिने एसटी बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. आता शाळकरी मुलेही त्यांची व्यथा मांडू लागले आहेत. एक शाळकरी मुलगा पाठीवर दप्तर टाकून कवितेच्या माध्यमातून थेट परिवहन मंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धारेवर धरत आहे. एसटी  सुरु करा, नाहीतर खुर्ची खाली करा, अशा शब्दांत हा शाळकरी मुलगा आता निर्वाणीचा इशारा देत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शाळकरी मुलाने व्यक्त केला त्रागा 

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाल्यापासून राज्यातील सर्वच भागातील नागरिकांचे हाल होत आहे. या संपाचा विशेष फटका ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना बसला आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर शाळा तर सुरू झाल्या, मात्र अनेक ठिकाणी एसटी सेवा सुरू झालेल्या नाहीत. दररोज शाळेला जाण्यासाठी एसटी उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागातील मुलांना शाळेत जाताना पायपीट करावी लागत आहे. शाळेत जायला एसटी उपलब्ध होत नाही, म्हणून पायपीट करावी लागणाऱ्या अशाच एका शाळकरी विद्यार्थ्याने परिवहन मंत्री अनिल परब यांना उद्देशून एक गाणे गात आपल्या समस्यांना वाचा फोडली आहे. या विद्यार्थ्याने परिवहन मंत्री परब यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली आहे. या विद्यार्थ्याने गायलेल्या गाण्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

(हेही वाचा गुढीपाडव्यामुळे एसटी कामगारांवरील कारवाई टळलीः

एसटी चालू करा

शाळेला जायला उशीर झायला
एसटी चालू करा,
परबसाहेब एसटी चालू करा

एसटीचा कारभार तुमच्याच हाती
कामगारांची तुम्ही केलात माती
आत्महत्या इथे झाल्यात किती
तरीपण तुम्हाला वाटेना भिती
जनतेचं हाल तुम्हीच केलं
खुर्ची खाली करा,
परबसाहेब खुर्ची खाली करा

मुख्यमंत्री आमचे उद्धव ठाकरे
घरात जाऊन गुपचूप झोपले
जिथं तिथं बंगले बांधून आपले
मेव्हण्याने तुमच्या भरलेत टोपले
निवडून यायला, मतं मागायला
येऊ नका आमच्या घरा
परबसाहेब, येऊ नका आमच्या घरा

(हेही वाचा ताठर भूमिका घेणा-या एसटी कामगारांवर कारवाई अटळ; नवीन भरती करणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.