उत्तर महाराष्ट्र, विदर्भात कोरोनानंतर आता म्युकोरमायकोसिसचे संकट

केईएम रुग्णालयात सध्याच्या घडीला म्युकोरमायकोसिसचे २५ रुग्ण आहेत. बहुतांश रुग्ण हे मुंबईबाहेरील असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. म्युकोरमायकोसिसच्या संसर्गाला साधारण नाकापासून सुरुवात होते. त्यानंतर हा संसर्ग तोंडाचा जबडा आणि मेंदूपर्यंत पसरत जातो.

73

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कोरोनाबरोबर आता म्युकोरमायकोसिसचे संकट उभे राहिले आहे. कोरोनाशी लढताना रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे अनेक रुग्णांना आता म्युकोरमायकोसिसची लागण होत आहे. हा आजार झपाट्याने वाढत असून हा ही आजार साथीच्या आजाराप्रमाणे पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

या आजारात अंधत्त्व येऊ शकते. तसेच रुग्णाच्या जगण्याची शक्यता केवळ ५० टक्के इतकीच असते. सध्या उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भात म्युकोरमायकोसिसचे अनेक रुग्ण सापडत आहेत. तसेच या आजारासाठी लागणारी औषधे महाग असल्यामुळे या औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे.

म्युकोरमायकोसिसवर फक्त केईएम येथे उपचार!

म्युकोरमायकोसिसवर उपचार फक्त मुंबईतील परळ येथे केईएम रुग्णालयामध्ये होत आहेत. सद्यस्थितीत या रुग्णालयात ३१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. यापैकी २५ जण मुंबईबाहेरील आहेत. याचा अर्थ राज्यात म्युकोरमायकोसिसचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने वेगाने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ग्लोबल रुग्णालयातील डॉ. मिलिंद नवलाखे यांनी सांगितले.

(हेही वाचा : सामंत-परबानू आता कोकणाकडे नजर ठेवा!)

संसर्ग तोंडाचा जबडा आणि मेंदूपर्यंत पसरत जातो

केईएम रुग्णालयात सध्याच्या घडीला म्युकोरमायकोसिसचे २५ रुग्ण आहेत. बहुतांश रुग्ण हे मुंबईबाहेरील असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. म्युकोरमायकोसिसच्या संसर्गाला साधारण नाकापासून सुरुवात होते. त्यानंतर हा संसर्ग तोंडाचा जबडा आणि मेंदूपर्यंत पसरत जातो. हा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्यानंतर डॉक्टरांच्या हातात उपचार करण्यासारखे फार काही उरत नाही, अशा शब्दांत डॉ. हेतल मारफातिया यांनी याचे भयावह रूप सांगितले आहे.

अँटी-फंगल रोगांवरील औषधांचा तुटवडा आणि महाग

सध्या मी दिवसाला म्युकोरमायकोसिसचे दोन नवे रुग्ण सापडत आहेत. हे प्रमाण वाढल्यास त्यांच्यावर उपचार कसे करायचे, ही समस्या असेल. कारण अँटी-फंगल रोगांवरील औषधांचा केवळ तुटवडाच नाही तर ही औषधेही प्रचंड महाग असल्याचे डॉ. संजीव झांबाने यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.