मुंबई महापालिका प्रशासनाच्यावतीने मुंबईकरांच्या स्वच्छता आणि आरोग्याच्यादृष्टीने विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात असल्या तरी दादर पश्चिम येथील गोल देवळासमोरील भागातच मागील अनेक दिवसांपासून मलनि:सारण वाहिनीतील मलमिश्रित पाणी रस्त्यावर वाहत असतानाही याकडे लक्ष दिले जात नाही. विशेष म्हणजे या वाहत्या पाण्यामुळे एकप्रकारची दुर्गंधीही पसरली असून याच पाण्यातून नागरिकांना जावे लागत आहे. मंदिरासमोरील मलमिश्रित पाणी वाहत असतानाही महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्याला ओसंडून वाहणारा मॅनहोल्स साफ स्वच्छ करावा असे वाटत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Dadar)
दादर पश्चिम येथील कबुतरखाना जवळ असलेल्या पुरातन गोल हनुमान मंदिराच्या समोरील बाजूस रस्त्याखालून मलनि:सारण वाहिनी जात आहे. या मलवाहिनीचा मॅनहोल्स हा अगदी मंदिराच्या समोर आहे. मलनि:सारण वाहिनी भरुन गेल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून या मॅनहोल्समधून मलमिश्रित पाणी वाहिले जाते. पाण्यासोबत मलही बाहेर येत असल्याने एकप्रकारे दुर्गंधी पसरली जात आहे. (Dadar)
(हेही वाचा – Bangladeshi infiltrators च्या जामिनासाठी स्थानिकांच्या आधारकार्डचा वापर; पुण्यात तक्रार दाखल)
मॅनहोल्समधील हे पाणी पाऊस सुरु असताना बाहेर वाहते तेव्हा याकडे नागरिकांचा लक्ष जात नाही. त्यामुळे या पाण्याचा अंदाज न आल्याने त्याच पाण्यातून चालतात. परंतु पाऊस थांबल्यानंतर यातून बाहेर पडणारे हे मलमिश्रित पाणी पाहून नागरिक नाकाला हात लावून दुसऱ्या बाजुने चालण्याचा प्रयत्न करतात. मॅनहोल्समधील हे पाणी पदपथा शेजारुन वाहत जावून पुढे असणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या मॅनहोल्समधून निघून जाते. परंतु अनेकांना या पाण्याचा अंदाज न आल्याने ते याच पाण्यातून चालून पुढे जातात. त्यामुळे मलनि:सारण प्रचालन विभाग करतोय काय? मंदिराच्या समोर मलमिश्रित पाणी वाहत असताना महापालिकेचे अधिकारी करतात काय असा सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे. एरव्ही सोसायटीत मलनि:सारण वाहिनी फुटल्यास त्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे तातडीने महापालिकेकडे पाठपुरावा करून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्नशील असणारे नागरिक दादरमधील या प्रकारानंतरही गप्प का असाही सवाल केला जात आहे. (Dadar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community