Muslim : हिंदूंना कुत्रा म्हणणाऱ्या मुफ्ती सलमान अझरीचा पोलीस कारवाईनंतर खुलासा 

760
मुंबईस्थित इस्लामिक (Muslim) धर्मोपदेशक मुफ्ती सलमान अझरी याने 31 जानेवारी रोजी रात्री येथील ‘बी’ विभाग पोलिस ठाण्याजवळील मैदानावर आयोजित कार्यक्रमात ‘काही वेळ शांतता आहे आणि मग आवाज येईल, आज कुत्र्यांची वेळ आहे, उद्या आमची पाळी येईल’, असे भडकाऊ वक्तव्य केले. मुफ्तीचे हे विधान व्हायरल झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला होता. गुजरातमधील जुनागडमध्ये भडकाऊ भाषण करणाऱ्या मौलाना मुफ्ती सलमान अजहरीला गुजरात एटीएसने ताब्यात घेतले आहे, त्यावर मुफ्ती याने स्वतःच्या बचावासाठी खुलासा केला.
मुफ्ती सलमान अजहरी (Muslim) याला घाटकोपर येथून अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात कलम 153A, 505, 188, 114 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जुनागड पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. रविवारी मुफ्तीच्या  अटकेचे वृत्त समजताच पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. गुजरात एटीएस मुफ्तीला मुंबईहून जुनागडला घेऊन जाणार आहे.
मुंबईच्या मुफ्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोलिसांच्या कारवाईवर स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या वक्तव्यावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी ट्विट करत आम्ही हिंदूंविरोधात द्वेष पसरवण्याचे काम करतो, असे अजहरीच्या वतीने लिहिण्यात आले आहे. निवेदनात एक कविता नमूद आहे जी तुम्ही लक्षपूर्वक ऐकावी. त्यात कुठेही हिंदू शब्द नाही. भाजपचे प्रवक्ते त्रिवेदी यांनी जबरदस्तीने त्यात हिंदू हा शब्द टाकला आहे आणि हिंदूंना कुत्रे म्हटले आहे, त्यामुळे सर्व हिंदूंनी या द्वेष पसरवणाऱ्या प्रवक्त्यावर कारवाई करावी.
जुनागडचे पोलिस अधीक्षक म्हणाले की, भडकाऊ भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अझहरी आणि स्थानिक आयोजक मोहम्मद युसूफ मलिक आणि अझीम हबीब ओडेद्रा यांच्याविरुद्ध आयपीएस कायदा 153B (विविध धार्मिक गटांमधील वैर वाढवणे) आणि 505 (विविध धार्मिक गटांमधील शत्रुत्व वाढवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 2 आयपीसी अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मलिक आणि हबीब यांना अटक करण्यात आली आहे, तर अझहरीला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अटक करण्यात आलेल्यांनी अजहरी धर्माविषयी बोलतील आणि व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करतील असे सांगून सभेसाठी पोलिसांकडून परवानगी घेतली होती, मात्र त्यांनी भडकाऊ भाषण केले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.