‘हे’ आहे मोहरम साजरा करण्यामागचे कारण

मुस्लिम धर्मातील शिया समुदाय मानत असलेल्या मोहरमला सुन्नी समुदायाप्रमाणे मुस्लिम धर्मातील देवबंद समुदायाचाही विरोध आहे. देवबंद समुदायाने तर याविरोधात फतवाच काढला होता.

104

मोहरम हा दिवस शिया मुसलमान मातम म्हणून साजरा करतात. कारण याच महिन्यामध्ये हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसन आणि हुसैन हे आपल्या ७२ साथींदाऱ्यांसोबत हुतात्मा झाले होते. म्हणून या दिवशी सामूहिक पद्धतीने शोक व्यक्त करताना शिया मुसलमान स्वतःला जखमा करून घेतात. तलवारीने स्वतःवर वार करून घेतात. धारदार लोखंडी साखळ्यांनी स्वतःला मारून घेतात. हसन, हुसेन आणि शिया मुसलमानांना शत्रूने त्यांना अशा पद्धतीने जखमा करून ठार केले होते. त्यावेळी शत्रूने हुसेन यांच्या नातेवाईकांना पाणीही मिळू होऊ दिले नव्हते, त्यामुळे शिया मुसलमान या निमित्ताने या काळात पाण्याचे वाटप करतात. मात्र मोहरमला सुन्नी समुदायाप्रमाणे मुस्लिम धर्मातील देवबंद समुदायाचाही विरोध आहे.

मोहरम इस्लामिक कॅलेंडरचा पहिला महिना!   

विशेष म्हणजे मोहरम हा इस्लामिक कॅलेंडरचा पहिलाच महिना असतो. चंद्र दिसताच मोहरमला सुरुवात होते. मुस्लिम धर्मातील शिया समुदाय मोहरम हा एक दु:ख व्यक्त करण्याचा महिना मानतात. हिजरी कॅलेंडरमध्ये चंद्राच्या आधारे तारखा निश्चित केल्या जातात. ग्रेगोरियन कॅलेंडर आणि इस्लामिक कॅलेंडरमध्ये खूपच फरक आहे. त्यामुळे दरवर्षी मोहरमची तारीखसुद्धा मागे-पुढे होत असते. इस्लामिक कॅलेंडरमध्ये ३६५ नव्हे तर फक्त ३५५ दिवस असतात.

(हेही वाचा : अमेरिकेच्या ‘त्या’ विमानाने अफगाण नागरिकांना चिरडले!)

१० दिवस असतो मोहरम

या निमित्ताने ताबूत बनविण्याचा प्रघात चौदाव्या शतकात विदेशी आक्रमक लंगडा अमीर तैमूरलंगने सुरू केला. या ताबुताचे तोंड मक्केकडे यांच्या श्रद्धास्थानाकडे करतात. हुसेन यांचे हत्याकांड झाले त्या दिवशी शत्रूने हुसेन यांच्या नातेवाईकांना पाणीही मिळू होऊ दिले नाही, म्हणून थंड पाण्याची सोय ठिकठिकाणी करतात. शेवटच्या दिवशी सर्व ताबूतांची मिरवणूक काढतात. हा ताबूत प्रकार फक्त भारत, पर्शिया व इजिप्तमध्ये पाळतात. महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील कडेगाव इथे ताबुताची प्रथा सुरु झाली. मोहरमनिमित्त या गावी २५० फूट उंचीचे बांबू पासून (कळक) ताबूत बनवले जातात. अष्टकोनी आकाराचे व पहिल्यांदा कळस आणि मग पाया या पद्धतीने हे ताबूत उभारले जातात व त्याची मिरवणूक काढली जाते.

हजरत हुसेन यांचा अंत का झाला? 

हजरत महंमद पैगंबर यांची मुलगी बीबी फातिमा ही लाडकी होती. त्यांना दोन मुले होती. हसन आणि हुसैन अशी त्या दोघांची नावे होती. इराकची राजधानी बगदादच्या करबला या गावामध्ये  इ.स. सातव्या शतकात मैदानात एक युद्ध झाले होते. त्यालाच ‘तारीख-ए-इस्लाम’ असे म्हटले जाते. इस्लामच्या रितीनुसार त्यांच्यामध्ये धर्माचे प्रमुख म्हणजे खलिफा निवडण्याची पद्धत आहे. हजरत मोहम्मद पैगंबरनंतर ४ खलिफा होऊन गेले. मात्र पाचवे खलिफा म्हणजेच आमिर मुअविया यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा यजीदने आपण स्वतः खलिफा असल्याचे जाहीर केले. मात्र इस्लाममध्ये अशी स्वयं घोषित पद्धत नव्हती. तसेच यजीद हा खूपच क्रूर होता. त्याला कोणतीच व्यक्ती खलिफा मानण्यास तयार नव्हती. त्यामुळे हसन हुसैनसह सर्वच लोकांनी त्याला विरोध दर्शवला. मात्र त्याने आपल्याविरुद्ध जाणाऱ्याचे शीर धडापासून वेगळे करण्याचा आदेश दिला. मात्र तरीसुद्धा हसनने त्यांचा आदेश न मानता मक्केकडे प्रवास करण्यास सुरुवात केली. मात्र यजीद क्रोधीत झाला आणि त्याने हसन आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्यासाठी आपले सैनिक पाठविले. आणि शेवटी ज्याची भीती होती तेच झाले. बगदादच्या करबला येथे यजीदच्या सैन्यासोबत हसन-हुसैन यांचे युद्ध झाले आणि यामध्ये हसनसह त्यांचे ७२ शिया मुसलमान साथीदार मारले गेले. नंतर हुसैन आणि त्यांच्या ८ वर्षाच्या मुलालादेखील मारण्यात आले. त्यामुळे हा महिना मुस्लिम धर्मातील शिया समुदाय दु:ख म्हणून साजरा करतात आणि हसन-हुसैन यांची आठवण काढतात.

(हेही वाचा : स्वरा भास्करला अटक करा! का सुरु झाला ट्विटर ट्रेंड?)

सुन्नी, देवबंद मुस्लिम समाजाचा मोहरमला का विरोध असतो? 

शिया आणि सुन्नी या मुसलमानांतील समुदायात कायम मतभेद असतात, मोहरमविषयीही सुन्नी समुदाय आस्था बाळगत नाहीत. हा समुदाय असे मानतो कि, अल्लाने केवळ त्याचीच आराधना करण्यासाठी मानवाला जन्म दिला आहे. हजरत महंमद, हजरत हुसेन हे मनुष्य होते आणि तेही अल्लाची आराधना करायचे. सुन्नी समुदाय केवळ अल्लाची आराधना करतात, त्याचे कुणी दूत असतील तर त्यांना मानत नाहीत. तसेच सुन्नी समुदाय हा मूर्ती पूजेवरही विश्वास ठेवत नाहीत, त्यामुळे ताबूतावरही  त्यांचा विश्वास नसतो. त्याचा इस्लाम धर्माशी काही संबंध नाही, असे सुन्नी समाज मानतो. सुन्नी समुदायाप्रमाणे मुस्लिम धर्मातील देवबंद समुदायाचे मुसलमानही मोहरम मानत नाहीत. देवबंद समुदायाने तर याविरोधात फतवा काढला होता. ज्यामध्ये मोहरममध्ये ताबूत उभारणे इस्लामविरोधी असल्याचे म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.