Muhurat Trading 2023 : बीएसई, एनएसईवर मुहुरत ट्रेंडिंगची वेळ जाहीर

दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बीएसई आणि एनएससी या दोन्ही शेअर बाजारात मुर्हूताचं ट्रेडिंग करण्याची परंपरा आहे. यंदा १२ नोव्हेंबरला होणाऱ्या या ट्रेडिंगच्या वेळा जाहीर झाल्या आहेत

165
Muhurat Trading : यंदा १ नोव्हेंबरला होणार दिवाळीचं मुहूर्ताचं ट्रेडिंग
  • ऋजुता लुकतुके

दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बीएसई आणि एनएससी या दोन्ही शेअर बाजारात मुर्हूताचं ट्रेडिंग करण्याची परंपरा आहे. यंदा १२ नोव्हेंबरला होणाऱ्या या ट्रेडिंगच्या वेळा जाहीर झाल्या आहेत. (Muhurat Trading 2023)

शेअर बाजारातील लोकांसाठी दिवाळीच्या मूहूर्तावर होणारं मूहूर्ताचं ट्रेडिंग ही वर्षाची नवीन सुरुवात करण्याचा दिवस आहे. कारण, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हिंदू संवत सुरू होतं आणि नवीन संवताच्या पहिल्या दिवशी नवीन शेअर खरेदीची आपल्याकडे परंपरा आहे. (Muhurat Trading 2023)

दरवर्षी राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) आणि मुंबई शेअर बाजार (BSE) या दोन्ही महत्त्वाच्या बाजारांमध्ये सव्वा तासाचं विशेष सत्र आयोजित करण्यात येतं. यंदाही १२ नोव्हेंबरला संध्याकाळी ६ ते ७.१५ वाजेपर्यंत हे विशेष सत्र सुरू राहणार आहे. शिवाय या सत्रापूर्वी १५ मिनिटांचं प्री-सेशनही होईल. (Muhurat Trading 2023)

(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन)

नवीन संवताची सुरुवात ही शुभ मानली जात असल्यामुळे बहुतेक वेळा इथं भारतीय लोकांचा खरेदीचाच कल असतो. त्यामुळे २०२१ मध्ये या दिवशी शेअर बाजार ०.४९ टक्क्यांनी तर २०२२ मध्ये ०.८९ टक्क्यांनी वर चढले होते. यंदा दिवाळीपूर्वी शेअर बाजारात थोडं मंदीचं वातावरण आहे. रशिया आणि युक्रेन दरम्यानचं न थांबणारं युद्ध आणि इस्त्रायलमधील अनिश्चितता यामुळे मागच्या आठवड्यात निफ्टी आणि सेन्सेक्स अशा शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांकांमध्ये किमान ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे नवीन संवत सकारात्मता घेऊन येईल का याक़डे आता सगळ्याचं लक्ष असेल. (Muhurat Trading 2023)

मूहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी नियमित शेअर बाजार दिवाळीच्या सुटीमुळे बंद असतो. आताही हे ट्रेडिंग सत्र रविवारीच होणार आहे. मूहूर्त ट्रेडिंगचा अनुभव असं सांगतो की, १० पैकी ७ सत्र ही आतापर्यंत हिरव्या रंगात बंद झाली आहेत. या विशेष ट्रेडिंग सत्रात समभागांबरोबरच कमेडिटीज, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज, इक्विटी फ्यूचर अँड ऑपशन असा सगळ्या प्रकारात ट्रेडिंग करता येईल. त्यानंतर १४ नोव्हेंबरला बलीप्रतिपदेच्या दिवशी दोन्ही शेअर बाजार बंद राहतील. (Muhurat Trading 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.