- ऋजुता लुकतुके
देशातील सर्वात दोन मोठे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी प्रथमच एकत्र आले आहेत. या दोन मोठ्या उद्योगपतींमध्ये करार (Agreement) झाला आहे. अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने आता अदानी समुहाच्या एका कंपनीत गुंतवणूक केली आहे. अंबानी आणि अदानी यांच्यात नेमका कोणता करार झाला आहे? अंबानी यांनी अदानी समुहात किती गुंतवणूक केलीय. याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. (Mukesh Ambani-Gautam Adani)
रिलायन्स समूहाने अदानी पॉवर प्रकल्पात २६ टक्के हिस्सा घेतला
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने अदानी पॉवर प्रकल्पात २६ टक्के हिस्सा घेतला आहे. प्रथमच या दोन उद्योगपतींमध्ये अशा प्रकारचा करार झाला आहे. रिलायन्स समूहाने अदानी पॉवर प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या ५०० मेगावॉट विजेसंदर्भात हा करार केला आहे. हे दोन्ही उद्योगपती भारतातील मोठे उद्योगपती आहेत. भारतात सर्वात श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी या दोघांमध्ये स्पर्धा असते. (Mukesh Ambani-Gautam Adani)
अंबानी आणि अदानी हे दोन्ही उद्योगपती हे गुजरातचे आहे. अंबानी हे तेल, वायू, दुरसंचार या व्यवसायांमध्ये आहेत. तर दुसरीकडं अदानी हे बंदरापासून, विमानतळ, कोळसा, खाणकाम या क्षेत्रात काम करतायेत. ग्रीन एनर्जी उद्योगात हे दोन्ही उद्योगपती ऐकमेकांचे प्रतिस्पर्धी समजले जातात. मात्र, एका उद्योगाचे निमित्ताने हे दोन्ही उद्योगपती एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. (Mukesh Ambani-Gautam Adani)
(हेही वाचा – Swatantra Veer Savarkar : मराठी भाषेतील स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपट आजपासून चित्रपटगृहांत; सुबोध भावेची पोस्ट चर्चेत)
जगातील सर्वात मोठ्या ग्रीन एनर्जी पार्कचे काम सुरु
अदानी समुहानं जगातील सर्वात मोठ्या ग्रीन एनर्जी पार्कचे काम सुरु केलं आहे. गुजरातमध्ये कच्छच्या रणमध्ये हे काम सुरु आहे. या प्रकल्पातून २ कोटींहून अधिक घरांना वीज देण्याचा प्रयत्न करण्यात यणार आहे. या प्रकल्पातून ३० GW वीज तयार करण्यात येणार आहे. भारतात अक्षय उर्जा निर्मितीत अदानी सुमह मोठा कामगिरी करत आहे. या प्रकल्पामुळं देशात उर्जेची गजर भागवण्यास मोठी मदत होणार आहे. (Mukesh Ambani-Gautam Adani)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community