मुकेश अंबानींना दिला रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा

95

देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनींपैकी एक असलेल्या रिलायन्स जिओच्या संचालक पदाचा मुकेश अंबानी यांनी राजीनामा दिला आहे. रिलायन्स जिओकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

आकाश अंबानी यांची नियुक्ती

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. मुकेश अंबानी यांच्या जागी आता त्यांचे सुपुत्र आकाश अंबानी यांची जिओच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिओने आपल्या इतर पदांच्या बाबतीतही मोठे बदल केले आहेत. यामध्ये पंकज मोहन पवार यांची जिओच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रामिंदर सिंग गुजराल आणि के.व्ही.चौधरी यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 27 जूनपासून या नव्या नियुक्त्या लागू झाल्या आहेत.

2021 मध्येच दिले होते संकेत

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी 2021 मध्येच कंपनीतील पदांच्या फेरबदलाबाबत विधान केले होते. रिलायन्सच्या कंपन्यांची जबाबदारी आता नवीन पिढीकडे सोपवण्यात येणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी म्हटले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.