Mukhtar Ansari : कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

मुख्तारच्या मृत्यूनंतर गाझीपूर, मऊ आणि इतर संवेदनशील जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. गाझीपूर आणि मऊमधील काही भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

338
Mukhtar Ansari : कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा (Mukhtar Ansari) हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. मुख्तारला छातीत वेदना होत असल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याचा गुरुवारी (२८ मार्च) उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुख्तार हा माजी उपराष्ट्रपती हामीद अन्सारी यांचा पुतण्या होता.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघात किती उमेदवारांचे अर्ज ठरले वैध? जाणून घ्या…)

कोण आहे मुख्तार अन्सारी ?

मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari) हा समाजवादी पार्टीकडून ५ वेळा आमदार राहिला होता. त्याच्यावर हत्या, खंडणी आणि जमीन बळकावण्याचे ६१ गुन्हे दाखल होते. तसेच कॉन्ट्रॅक्टर सच्चिदानंद राय यांच्या हत्येचा गुन्हा अन्सारीवर होता. त्याचबरोबर काँग्रेस नेते अवधेश राय यांची त्याने काशी येथे हत्या केली होती. त्याशिवाय भाजपाचे आमदार कृष्णानंद राय यांची मुख्तारने २१ गोळ्या घालून हत्या केली होती. याप्रकरणी मुख्तारला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

(हेही वाचा – Offices of Sub-Registrar : 29 ते 31 मार्च या सार्वजनिक सुट्यांमध्येही घरांचे रजिस्ट्रेशन करू शकता, दुय्यम निबंधक कार्यालय सुरु असणार)

माझा खून करण्याचा प्रयत्न सुरु आहे :

गेल्या काही दिवसांपासून मुख्तारची (Mukhtar Ansari) प्रकृती बिघडल्यामुळे मंगळवारी २६ मार्च रोजी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुख्तार अन्सारीचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच त्याच्या गाझीपूर इथल्या निवासस्थानाबाहेर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. या बातमीमुळं कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून ज्या रुग्णालयात सध्या त्याचे पार्थीव ठेवण्यात आले आहे, त्या बांदा मेडिकल कॉलेजबाहेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. मुख्तार अन्सारीने (Mukhtar Ansari) न्यायालयात सुनावणी दरम्यान, गंभीर आरोप केले होते. तुरुंगात माझा खून करण्याचा प्रयत्न सुरु आहे असा दावा त्याने केला होता.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : निवडणुका सुरळीत पार पाडण्यात माध्यमांची भूमिका महत्वाची – डॉ. किरण कुलकर्णी)

संवेदनशील जिल्ह्यात अलर्ट जारी :

जेवणातून सौम्य स्वरुपात विष देण्यात येत आहे. त्यामुळेच माझी प्रकृती बिघडत आहे. या प्रकरणी न्यायालयाने जेल प्रशासनाकडून या मुख्तार अन्सारीचा संपूर्ण अहवाल देखील मागवला होता. मुख्तारच्या मृत्यूनंतर गाझीपूर, मऊ आणि इतर संवेदनशील जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. गाझीपूर आणि मऊमधील काही भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. (Mukhtar Ansari)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.