लाडक्या बहिणीसाठी गुडन्यूज! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mukhyamantri Ladki bahin yojana) १ कोटींपेक्षा जास्त अर्ज शासन दरबारी प्राप्त झाले असून, या अर्जाचा ओघ अद्यापही कायम आहे. कारण, राज्य सरकारने (Maharashtra State Govt) १५ ऑगस्टची मुदत वाढवून आता ३१ ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे. त्यामुळे या योजनेसाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज भरण्यात येत आहे. दरम्यान बुधवारी (८ ऑगस्ट) मंत्रीमंडळात बैठक घेण्यात आली होती. यामध्ये १७ ऑगस्ट रोजी या योजनेचा दोन्ही हफ्ते असे एकूण मिळून ३००० रुपयांची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे, रक्षाबंधनापूर्वीच (Rakshabandhan) बहिणींना ओवाळणी मिळणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. (Mukhyamantri Ladki Bahin Yojana)
(हेही वाचा – खासदार अरविंद सावंत यांच्या नावाने Bademian Restaurant ला लावला 12 लाखांचा चुना; 200 प्लेट बिर्याणी फस्त)
मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, १७ ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार असल्याचीही माहिती आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे १७ ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरीत केले जाणार आहेत.तसेच या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. तर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील. (Mukhyamantri Ladki Bahin Yojana)
(हेही वाचा – Nepal Helicopter Crash: नेपाळमधील नुवाकोट येथे हेलिकॉप्टर कोसळले, ४ प्रवाशांचा मृत्यू)
नामंजूर झालेले अर्ज, पुन्हा नव्याने भरता येणार?
सध्या तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर महिलांच्या आलेल्या अर्जांची आकडेवारी समोर येत आहेत. तसेच या अर्जामध्ये महिला भगिनींचे मंजूर अर्ज, प्रलंबित अर्ज आणि नामंजूर अर्जही देण्यात येत आहेत. तर, प्रलिंबित अर्जांमधील काही त्रुटी दुरुस्त करुन ते मंजूर केले जाणार आहेत. तर, नामंजूर करण्यात आलेल्या अर्जांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. (Mukhyamantri Ladki Bahin Yojana)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community