महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील १० हजार लाडक्या बहिणी (ladki bahin yojana ten thousand women are ineligible) आता नाराज झाल्या आहेत, कारण या लाडक्या बहिणींचे फॉर्म अपात्र ठरविण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जाची छाननी सुरू करण्यात आली. त्यात विविध त्रुटींमुळे बहिणी अपात्र ठरत असल्याचे दिसून येत आहे. अशी माहिती समाज कल्याण विभागांने (Department of Social Welfare) दिली. (Mukhyamantri Ladki Bahin Yojana)
(हेही वाचा – Belated ITR For FY2024 : आर्थिक विवरणपत्र भरण्याची ही आहे अखेरची संधी)
पुणे जिल्ह्यातील २० लाख ८४ हजार अर्जदारांना योजनेचा लाभ मिळाल्याची माहिती महिला बालकल्याण विभागाने दिली. योजनेसाठी १५ ऑक्टोंबरपर्यंत जिल्ह्यातून २१ लाख ११ हजार ३६३ मंजूर करण्यात आले होते. अजूनही १२ हजार अर्जाची छाननी बाकी आहे. आतापर्यंत ९ हजार ८१४ अर्ज त्रुटीमुळे अपात्र ठरले आहेत. तसेच ५ हजार ८१४ अर्जामध्ये किरकोळ त्रुटी सापडल्याने तात्पुरते नाकारण्यात आले आहेत. (Mukhyamantri Ladki Bahin Yojana)
पुणे शहरातून (Pune) ६ लाख ८२ हजार ५५ अर्ज आले. त्यातील ६ लाख ६७ हजार ४० अर्ज मंजूर झाले.तर ३ हजार ४९४ अर्ज अपात्र ठरले आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त हवेली तालुक्यात सर्वात जास्त अर्ज आले. ४ लाख १९ हजार ८५९ अर्ज आले तर त्यातील ४ लाख १५ हजार ५१० अर्ज मंजूर करण्यात आले. यातील १ हजार १६६ अर्ज अपात्र ठरले आहे. जिल्ह्यात एकूण २१ लाख ११ हजार ९४६ अर्ज आले. त्यातील २० लाख ८४ हजार ३६५ अर्ज मंजूर झाले. तर ९ हजार ८१४ अर्ज अपात्र ठरले.
(हेही वाचा – Cabinet Expansion : ‘क्लिन कॅबिनेट’ मुळे मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळाला होत आहे उशीर)
पिंपरी चिंचवड मध्ये ४२ हजार अर्ज बाद
पिंपरी-चिंववडमधून (Pimpri-Chimwad) तब्बल ४ लाख ३२ हजार ८९० अर्ज लाडक्या बहिणींनी भरले होते. त्यापैकी ३ लाख ८९ हजार ९२० महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या. त्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे दरमहा दीड हजार रुपयांची रक्कम त्यांना मिळाली आहे. तर, ४२ हजार ४८६ अर्ज बाद ठरण्यात आले आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community