Mukhyamantri Ladki Bahin Yojana: सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ; स्वतः मुख्यमंत्र्यांनी भरला भगिनीचा फॉर्म

199
Mukhyamantri Ladki Bahin Yojana: सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ; स्वतः मुख्यमंत्र्यांनी भरला भगिनीचा फॉर्म
Mukhyamantri Ladki Bahin Yojana: सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ; स्वतः मुख्यमंत्र्यांनी भरला भगिनीचा फॉर्म

महिलांच्या सक्षमीकरणामुळेच देश महासत्ता होईल. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणारी कायमस्वरुपी योजना असून सरकारकडून बहिणींना माहेरचा आहेर आहे. तसेच राज्यातील महिलांना आर्थिक, सामाजिक, राजकीय, (CM Ekanth Shinde) यांनी सिल्लोड (Sillod) येथे महिला सशक्तीकरण मेळाव्यात उपस्थित बहिणींना संबोधित केले. (Mukhyamantri Ladki Bahin Yojana)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सशक्तीकरण अभियानाचे शुक्रवारी (२ ऑगस्ट) रोजी सिल्लोड येथे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. तसेच जिल्ह्यात दोन लाख महिलांना लाभ मंजूर झाल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. (Mukhyamantri Ladki Bahin Yojana)

(हेही वाचा – Marathi Sahitya Sammelan : ९८ व्या संमेलनासाठी नवी दिल्लीत स्थळ पाहणी)

स्वतः मुख्यमंत्र्यांनी भरला फॉर्म

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी दिव्या रामदास सपकाळ या बहिणीचा फॉर्म स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Sillod CM Ekanth Shinde) यांनी भरला आणि त्यावर तिची सही घेऊन तो फॉर्म जिल्हाधिकारी दिलीप स्वामी (Collector Dilip Swamy) यांच्याकडे मंजूरी प्रक्रियेसाठी सुपूर्द केला.

(हेही वाचा – Mumbai Under Water: २०४० पर्यंत दहा टक्के मुंबई पाण्याखाली जाणार? जाणून घ्या  तज्ज्ञांनी कारणही सांगितले)

पारंपारिक वेशभुषेतील बहिणी आणि रक्षाबंधन

या सोहळ्यास महिला पारंपारिक वेशभुषेत पेहराव करुन सहभागी झाल्या होत्या. अनेक महिलांनी व्यासपीठावर जाऊन मुख्यमंत्र्यांना राखी बांधली व त्यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी सर्व महिलांना मोबाईल टॉर्च सुरु करण्याचे आवाहन केले त्यास उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (Mukhyamantri Ladki Bahin Yojana)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.