राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) मुंबईतून आतापर्यंत सुमारे सहा लाख अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू असून छाननीसाठी प्रत्येक विभागामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. प्रतितास ४० अर्जांची छाननी करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने विभाग कार्यालयांना दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) यंत्रणेमार्फत मुंबईमध्ये ही योजना राबवली जात आहे.
(हेही वाचा – हे लोक फक्त पैसे लुटत आहेत; IAS ची तयारी करत असलेल्या महाराष्ट्रातील तरुणीची आत्महत्या)
दोन पाळ्यांमध्ये काम करण्याचे निर्देश
अर्जांची छाननी वेगाने व्हावी, यासाठी पालिका प्रशासनाने विभाग कार्यालयांना निर्देश दिले आहेत. प्रत्येक विभाग कार्यालयात १० संगणक उपलब्ध करून स्वतंत्र कक्ष स्थापन करावा. प्रत्येक संगणकावर सकाळी ७ ते दुपारी ३ आणि दुपारी ३ ते रात्री ११ अशा दोन पाळ्यांमध्ये काम करावे. प्रत्येक पाळीमध्ये या योजनेची सखोल माहिती असलेल्या पर्यवेक्षकांची नेमणूक करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यातील महिला वर्गाला खूश करण्यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणली आहे. महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पात्र महिलांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले जात आहेत. शिवाय विभागांमध्ये कार्यरत असलेल्या नागरी सुविधा केंद्रावरही (सीएफसी) ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेकडे आतापर्यंत शहर विभागातून सुमारे पावणेदोन लाख अर्ज आले आहेत, तर उपनगरातून सुमारे चार लाख अर्ज आले आहेत. (Mukhyamantri Ladki Bahin Yojana)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community