मुख्यमंत्री लाडकी बहीण योनजेचा (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) तिसरा टप्प्यातील निधी हस्तांतरणास (Ladki Bahin Yojana 3rd Installment) सूरूवात झाली आहे. यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे. काहींच्या खात्यात 4500 तर काहींच्या खात्यात 3500 रूपये जमा झाले आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या टप्प्यात नेमक्या किती महिलांच्या खात्यात तिसरा टप्पा जमा झाला आहे. याचा अधिकृत आकडा समोर आला आहे. तसेच तुमच्या अर्जाचं नेमकं काय झालं आहे? हे देखील जाणून घेऊयात. (Mukhyamantri Ladki Bahin Yojana)
आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक २९ सप्टेंबर रोजी ३४,७४,११६ भगिनींना ५२१ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हफ्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक 29 सप्टेंबर रोजी 34,74,116 भगिनींना 521 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाचे (1)@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 29, 2024
(हेही वाचा – Tilak Smarak Mandir Pune या ठिकाणांचे काय आहेत प्रमुख वैशिष्ट्ये?)
दरम्यान अद्याप ज्या महिलांच्या खात्यात पैसेच जमा झाले नाहीत. त्या महिलांना देखील आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिलासा दिला आहे. ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसे आले नाहीत, त्या महिलांच्या लाभ हस्तांतरणाचे प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. (Mukhyamantri Ladki Bahin Yojana)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community