Mukhyamantri Majhi ladki Bahin Yojana आता संकेतस्थळावरही अर्ज सादर करता येणार

277
Majhi Ladki Bahin Yojana च्या नोंदणीला मुदतवाढ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत (Chief Minister Majhi ladki Bahin Yojana) महिला लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी www.ladkibahin.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ दि. १ ऑगस्टपासून सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंतकुमार भदाणे (Hemant Kumar Bhadane) यांनी दिली आहे.

(हेही वाचा – Paris Olympic 2024: कोल्हापूरच्या पठ्ठ्यानी जग जिंकलं! नेमबाज Swapnil Kusale ला मध्य रेल्वेकडून मोठं गिफ्ट! )

ज्या लाभार्थ्यांनी “नारी शक्ती दूत” (Nari shakti Doot app) ॲपवर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टलवर अर्ज भरण्याची गरज नाही. ज्या पात्र इच्छुक महिला लाभार्थांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्यांनी www.ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावून आपले अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीष जाधव (District Women and Child Development Officer Girish Jadhav) यांनी केले आहे.

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.