मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) जानेवारी महिन्याचा हफ्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री (Minister of Women and Child Development) आदिती तटकरे (Aditi Tatkare ) यांनी आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
( हेही वाचा : Republic Day 2025 : भारतीय संविधानाचा पाया खरेच ‘सेक्युलर’ आहे का?)
मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी एक्स पोस्टमध्ये लिहले की, जानेवारी २०२५ या महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक (Bank) खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दि. २४ जानेवारीपर्यंत १.१० कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून दि. २६ जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे, अशी माहिती तटकरेंनी दिली. (Aditi Tatkare)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community