Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी व्यक्त केली कृतज्ञता

119
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी व्यक्त केली कृतज्ञता
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी व्यक्त केली कृतज्ञता

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये आपल्या खात्यात जमा झाले का? या योजनेसाठी कोणत्याही मध्यस्थाला पैसे द्यायचे नाहीत. हे पैसे तुमच्या हक्काचे आहेत. तुम्हाला आता हक्काचे भाऊ भेटले आहेत आणि आम्हाला हक्काच्या बहिणी भेटल्या आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknaath Shinde) यांनी आपल्या लाडक्या बहिणींशी संवाद साधला. (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana)

सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknaath Shinde) संवाद साधत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार सर्वश्री. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण आदी उपस्थित होते. (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana)

(हेही वाचा – झारखंडचे माजी मुख्यमंत्री Champai Soren बंडाच्या तयारीत; राजकीय भूकंप होण्याची शक्यता)

सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला होता. दुपारी 12 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सकाळपासूनच जिल्ह्याच्या विविध भागातून महिला मोठ्या प्रमाणावर सैनिक स्कूलच्या मैदानाच्या दिशेने येत होत्या. यावेळी जवळपास 50 हजारांच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आपल्या बहिणींशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. तुमच्या खात्यावर मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का?, या पैशाचा उपयोग कसा करणार आहात? असे प्रश्न विचारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्स्फुर्त संवाद साधला. यावर अनेक महिलांनी शिलाई मशिन घेणार आहोत, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे वापरणार आहोत. आमच्या मुलांना शिकवून मोठे करणार आहोत, असे सांगून कृतज्ञता व्यक्त केली. लाडक्या बहिणींनी लाडके भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राख्या बांधून भविष्याच्या वाटचालीसाठी आर्शीवाद देवून शुभेच्छा दिल्या. (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana)

यावेळी एका बहिणीने ज्या महिलांचे कधी खाते सुद्धा उघडले गेले नव्हते, अशा लाखो महिलांची खाती या योजनेमुळे बँकेत उघडली गेली आहेत, एवढेच नव्हे तर त्यांच्या खात्यावर पैसेही जमा झाले आहेत. याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना सलाम करते अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी उपस्थित महिलांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना मोबाईलचे टॉर्च दाखवून अभिवादन केले. याला तितक्याच उत्स्फुर्तेने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला. आगमनप्रसंगी महिलांनी फुलांची उधळण करत आपल्या लाडक्या भाऊरायांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या घरी परत जात असताना सुखरुप व सुरक्षित जा, आपल्या संपूर्ण परिवारासोबत राखी पोर्णिमा सण उत्साहात साजरा करा अशा शुभेच्छा ही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.