विधानसभा निवडणुकीमुळे स्थगित केलेली Mukhyamantri Teerth Darshan Yojana अद्यापही बंदच; ज्येष्ठांमध्ये नाराजीचा सूर

64
विधानसभा निवडणुकीमुळे स्थगित केलेली Mukhyamantri Teerth Darshan Yojana अद्यापही बंदच; ज्येष्ठांमध्ये नाराजीचा सूर
विधानसभा निवडणुकीमुळे स्थगित केलेली Mukhyamantri Teerth Darshan Yojana अद्यापही बंदच; ज्येष्ठांमध्ये नाराजीचा सूर

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रेची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू केले होते. ही योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly elections) सुरु करण्यात आली होती. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रेची सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने देशभरातील ७३ आणि राज्यातील ६६ अशा १३९ धार्मिक स्थळांची यादी तयार केली आहे. मात्र, मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा आचारसंहिता लागल्यापासून स्थगित असून अद्यापही नव्याने अर्ज स्वीकारणे सुरु झालेले नाही. (Mukhyamantri Teerth Darshan Yojana)

राज्यातील ६,५०० ज्येष्ठ नागरिकांचे अयोध्यावारीचे स्वप्न पूर्ण
निवडणुकीपूर्वी राज्यातील ६,५०० ज्येष्ठ नागरिकांचे अयोध्यावारीचे (Ayodhya) स्वप्न पूर्ण झाले होते. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी नव्याने अर्ज स्वीकारणे थांबवले गेले. आचारसंहिता संपल्यानंतर अद्यापही अर्ज स्वीकारणे सुरू झाले नाही. (Mukhyamantri Teerth Darshan Yojana)

एका जिल्ह्यातून सरासरी ८०० ज्येष्ठ नागरिकांचे टार्गेट
आचारसंहिता संपल्यानंतर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे अर्ज नव्याने स्वीकारण्याबाबत शासनाकडून आदेश आले नाहीत. आदेश येताच अर्ज स्वीकारण्यात येतील, असे सांगण्यात येत आहे. लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखांपेक्षा जास्त नसावी. निवडणुकीपूर्वी एका जिल्ह्यातून सरासरी ८०० ज्येष्ठ नागरिकांचे टार्गेट होते. (Mukhyamantri Teerth Darshan Yojana)

‘अशी’ आहे योजना
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत जिल्हानिहाय निश्चित केलेल्या कोट्याच्या आधारे लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या पात्र व्यक्तींना निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेसाठी एकावेळी लाभ घेता येतो. यात प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास आदींचा समावेश आहे. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती ३० हजार रुपये असून हा खर्च सरकारकडून करण्यात येतो राज्यात आतापर्यंत ९ जिल्ह्यांमधून एकूण ६५०० ज्येष्ठांनी याचा लाभ घेतला आहे. (Mukhyamantri Teerth Darshan Yojana)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.