महाराष्ट्र राज्याला संतांची भूमी म्हटले जाते याच धर्तीवर आधारित शिंदे-फडणवीस सरकारच्या वतीने आता राज्यातील जनतेला देवदर्शन (Devdarshan) घडविले जाणार आहे. पात्र व्यक्तीच्या प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार करणार आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर परराज्यातील तीर्थस्थळांना देखील लोकांना जाता येणार आहे. या योजनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती, त्या (Mukhyamantri Tirth Darshan Yojana GR) योनजेचा शासन आदेश रविवारी दि. 14 रोजी काढण्यात आला असून यात काही नियम अटी घालण्यात आलेल्या आहेत, तर या योजनेचा लाभ कोणाला व कसा घेता येणार याविषयी सर्व माहिती देण्यात आलेली आहे. (Mukhyamantri Tirth Darshan Yojana)
कशी होणार पात्र व्यक्तीची निवड
सदर योजनेवर अंकुश ठेवण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय समिती संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आहे. ही समिती याविषयीच्या अर्जाची छाननी करुन पात्र व्यक्तीची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल. (Mukhyamantri Tirth Darshan Yojana)
(हेही वाचा – आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचे काम करतायेत; Chhagan Bhujbal यांचा शरद पवारांवर गंभीर आरोप)
काय आहेत अटी आणि शर्ती
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 60 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार आहे. निर्धारित तीर्थस्थळापैकी एका तीर्थस्थळाला भेट देण्याचा यात्रेकरूंना अधिकार असेल. प्रवास खर्चाची प्रतिव्यक्ती मर्यादा 30 हजार कमाल आहे. यामध्ये भोजन निवास इत्यादी बाबींचा समावेश आहे. लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसले पाहिजे. या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार नसावे, अन्यथा लाभ मिळणार नाही. ट्रॅक्टर वगळून इतर चारचाकी वाहन असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. (Mukhyamantri Tirth Darshan Yojana)
(हेही वाचा – BMC : अपघातात गंभीर जखमी श्वानाला बृहन्मुंबई महानगरपालिका आणि रेल्वेच्या समन्वयामुळे मिळाली वैद्यकीय मदत, प्राण वाचले)
महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे राज्यातील 66 तीर्थक्षेत्राचा समावेश
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत राज्यातील एकूण 66 तीर्थक्षेत्राचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये सिद्धविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, चैत्यभूमी, माऊंट मेरी चर्च, मुंबादेवी, वाळकेश्वर मंदिर, गोराई येथील विश्व विपश्यना पॅगोडा, शिर्डीचे साई मंदिर, पंढरपूरसह राज्यातील अनेक मोठ्या स्थळांचा समावेश आहे. (Mukhyamantri Tirth Darshan Yojana)
(हेही वाचा – आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचे काम करतायेत; Chhagan Bhujbal यांचा शरद पवारांवर गंभीर आरोप )
संतांची भूमी महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांची यादी…!
1. सिद्धिविनायक मंदिर मुंबई | 2. महालक्ष्मी मंदिर मुंबई | ३. चेत्यभूमी दादर मुंबई | ४. माउंट मेरी चर्च (वांद्रे) मुंबई | ५. मुंबादेवी मंदिर मुंबई | ६. वाळकेश्वर मंदिर मलबार हिल मुबई | ७. विश्व विपड्यना पॅगोडा गोराई मुंबई | ८. चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ, कॅवेल मुंबई | ९. सेंट अंडरयू चर्च मुंबई | १०. सेट जान द बँप्टिस्ट चर्च , सीप्झ औद्योगिक क्षेत्र, अंधेरी, मुंबई | ११. सेंट जॉन द बप्टिस्ट चर्चे, मरोळ मुंबई १२. | गोदीजी पार्श्वत मंदिर मुंबई १३. | नेसेट एलियाहू मुंबई १४. | शार हरहमीम सिनेगॉग , मस्जिद भंडार मुंबई १५. | मॅगेन डेव्हिड सिनेगॉग , भायखळा मुंबई १६. | सेंट जॉन द बँप्टिस्ट चर्च ठाणे १७. | अग्यारी / अग्निमंदिर ठाणे १८. | मयुरेश्वर मंदिर , मोरगाव पुणे १९. | चितामणी मंदिर , थेऊर पुणे २०. | गिरिजात्मज मंदिर , लेण्याद्री पुणे २१. | महागणपती मंदिर , रांजणगाव पुणे २२. | खंडोबा मंदिर , जेजुरी पुणे २३. | संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर , आळंदी पुणे २४. | भीमाशंकर ज्योतिलिंग मंदिर, खेड तालुका पुणे | २५. संत तुकाराम महाराज समाधी मंदिर, देहू पुणे | २६. संत चोखामेळा समाधी , पंढरपूर सोलापूर २७. | संत सावतामाळी समाधी मंदिर अरण ता. माढा सोलापूर २८. | विठोबा मंदिर , पंढरपूर सोलापूर २९. | शिखर शिगणापूर सातारा ३०. | महालक्ष्मी मंदिर , कोल्हापूर कोल्हापूर ३१. | जोतिबा मंदिर कोल्हापूर ३२. | जैन मंदिर, कुंभोज कोल्हापूर 33. | रेणुका देवी मंदिर , माहूर नांदेड | ३४. गुरु गोविद सिंग समाधी, हजूर साहिब , नांदेड नांदेड ३५. | खंडोबा मंदिर, मालेगाव नांदेड ३६. | श्री संत नामदेव महाराज देवस्थान, उब्रज ता. कंधार नांदेड ३७. | तुळजा भवानी मंदिर , तुळजापूर धाराशिव ३८. | संत एकनाथ समाधी, पैठण छत्रपती संभाजीनगर ३९. | घृष्णेश्वर ज्योतिलिंग मंदिर , वेरूळ छत्रपती संभाजीनगर ४o. | जैन स्मारके , एलोरा लेणी छत्रपती संभाजीनगर ४१. | विघ्नेश्वर मंदिर, ओझर नाशिक ४२. | संत निवृत्तीनाथ समाधी, त्र्यंबकेश्वर जवळ नाशिक ४३. | त्र्यंबकेश्वर शिव मंदिर , त्र्यंबकेश्वर नाशिक ४४. | नाशिक ४५. | सप्तशंगी मंदिर , वणी नाशिक ४६. | काळाराम मंदिर नाशिक ४७. | जैन मंदिरे, मांगी-तुंगी नाशिक ४८. | गजपंथ नाशिक ४९. | संत साईबाबा मंदिर, शिर्डी अहमदनगर ५०. | सिद्धिविनायक मंदिर , सिद्धटेक अहमदनगर ५१. | शनी मंदिर , शनी शिंगणापूर , अहमदनगर ५२. | श्रीक्षेत्र भगवानगड , पाथर्डी अहमदनगर ५३. | बल्लाळेश्वर मंदिर , पाली रायगड ५४. | संत गजानन महाराज मंदिर , शेगाव बुलढाणा ५५. | एकवीरा देवी , काली पुणे ५६. | श्री दत्त मंदिर, औदुंबर सांगली ५७. | केदारेश्वर मंदिर बीड ५८. | वैजनाथ मंदिर, परळी बीड ५९. | पावस रत्नागिरी ६०. | गणपतीपुळे रत्नागिरी ६१. | मार्लेश्वर मंदिर रत्नागिरी ६२. | महाकाली देवी चंद्रपूर ६३. | श्री. काळेश्वरी उर्फ काळुबाई मंदिर सातारा ६४. | अष्टदशभुज (रामटेक) नागपूर ६५. | दीक्षाभूमी नागपूर ६६. | चिंतामणी (कळंब) यवतमाळ. (Mukhyamantri Tirth Darshan Yojana)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community