उत्तरप्रदेशचे (Uttar Pradesh) माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या स्मारकासाठी भूमीपूजन करण्यात आले. (Mulayam Singh’s Memorial) त्यांचा मुलगा आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी वैदिक मंत्रोच्चारात भूमीपूजन केले. मुलायम सिंहांचे पैतृक गाव सैफईमध्ये हे भूमीपूजन झाले. या वेळी समाजवादी पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांसह कुटुंबीयही उपस्थित होते.
(हेही वाचा – MSRTC : एसटीच्या ताफ्यात ‘इतक्या’ बसेस होणार दाखल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी)
80 कोटी रुपये खर्च
अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी मुलायम सिंह यांच्या निधनानंतर त्यांची सैफई (Saifai) मध्ये समाधी बांधली. आता त्या समाधीभोवतीच मुलायम सिंहांचे मोठे स्मारक उभे राहत आहे. हे स्मारक सुमारे 8.3 एकर परिसरावर उभे राहत आहे. त्यासाठी 80 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. त्या स्मारकाचे भूमीपूजन अखिलेश यादव यांनी वैदिक मंत्रोच्चारात केले.
यादव सरकारचा कारसेवेला विरोध
अयोध्येत 1990 मध्ये श्रीराम जन्मभूमीपाशी कारसेवा झाली. त्या वेळी उत्तरप्रदेशमध्ये मुलायम सिंह हे मुख्यमंत्री होते. त्या वेळी रामभक्तांवर गोळ्या झाडण्याचे आदेश दिले होते. केंद्रातील विश्वनाथ प्रताप सिंह सरकारचा आणि उत्तर प्रदेशातील मुलायम सिंह यादव सरकारचा कारसेवेला विरोध होता. हा विरोध मोडून काढत लाखो कारसेवक अयोध्येत जमले होते. या कारसेवकांना विरोध करून बाबरी मशिदीचे (Babri Masjid) समर्थन करण्याचा मुलायम सिंह यादवांचा हट्ट होता.
(हेही वाचा – Air Pollution : महापालिकेच्या दिव्याखाली अंधार, मुख्यालयातच धुळीचे साम्राज्य)
रामभक्तांवर गोळ्या घालण्याचे आदेश
बाबरी मशिदीपाशी कारसेवा होताच कामा नये, यासाठी मुलायम सिंह यादव यांनी उत्तर प्रदेश पोलिसांना कडेकोट बंदोबस्ताचे आदेश दिले होते. यावेळी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी पोलिसांना कारसेवकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. पोलिसांच्या गोळीबारात २ कारसेवक हुतात्मा झाले, तर शेकडो कारसेवक जखमी झाले. मुलायम सिंह यांच्या आदेशाने पोलिसांनी कारसेवकांवर भयंकर अत्याचार केले. ज्यांनी रामभक्तांवर गोळ्या घालण्याचे आदेश दिले, त्याच मुलायमसिंह यांच्या स्मारकाचे वैदिक घोषात भूमीपूजन झाले. (Mulayam Singh’s Memorial )
हेही पहा –
Join Our WhatsApp Community