राज्यात मागील काही दिवसांपासून ‘हिट अँड रन’ च्या घटना वाढत आहेत. पुन्हा आर्थिक राजधानी मुंबईत अशीच एक घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. संबंधित घटना ही सोमवारी (२२ जुलै) सकाळी साडे सहा वाजता मुलुंड डंपिंग रोड येथे घडली. या घटनेमध्ये भरधाव ऑडीने दोन रिक्षांना धडक दिली. तसेच या अपघातात चार जण जखमी झाले असून ऑडीकार चालक फरार झाला आहे. (Mulund Hit And Run)
(हेही वाचा – Shubman Gill : ‘शुभमन भविष्यात तीनही प्रकारात भारताचं नेतृत्व करू शकतो’)
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव ऑडीने मुलुंडमध्ये दोन रिक्षांना जोरात धडक दिली. यातील एका रिक्षात (Auto) दोन प्रवासी होते. या अपघातात एकूण चार जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर ऑडी कार तेथेच सोडून चालक पळून गेला आहे. पोलिसांनी ऑडी ताब्यात घेतली असून अधिक तपास केला जात आहे. (Mulund Hit And Run)
(हेही वाचा –Budget Session 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधी पक्षातील खासदारांना सल्ला; म्हणाले… )
यापूर्वी ही घडली होती भीषण घटना
मुंबईतील वरळी येथे बीएमडब्ल्यू कार (BMW car) चालकाने दुचाकीला धडक देत एका मासळी विक्रेत्या महिलेला २ किमी फरफटत नेलं होतं. त्यात तिचा मृत्यू झाला होता. मिहीर शहा (Mihir Shah) असे कारचालकाचे नाव असून त्याने अपघातानंतर थांबण्याचे सौजन्य न दाखवता बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेचा जीव घेतला. तर पुणे येथे कल्याणीनगर भागात एका उद्योगपतीच्या अल्पवयीन मुलाने वेदांत अग्रवाल (Vedanta Aggarwal) भरधाव पोर्श कार चालवत तरुण-तरुणीला ठार मारले. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असतानाच आता पुन्हा एकदा मुंबईत हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. (Mulund Hit And Run)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community