मुलुंड पोलीस ठाण्याच्या आवारात उघड्यावर पडलेल्या गुटख्याच्या गोण्यांमधील गुटख्याची पाकिटे घुशींकडून फस्त केली जात असल्याच्या ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या वृत्ताची दखल पोलिसांनी घेत उघड्यावर पडलेला गुटखा सुरक्षितस्थळी हलविला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरच या गुटख्याची विल्हेवाट लावण्यात येईल अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. (Mulund Police Station)
मुलुंड पोलिसांनी २०२१ मध्ये केलेल्या कारवाईनंतर शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ४ टेम्पो भरून गुटखा जप्त करून काहीजणांना अटक करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेला गुटखा जवळपास २० लाख रुपयांच्या घरात होता, जप्त करण्यात आलेला गुटख्यात मोठ्या प्रमाणात गोवा गुटख्यासह वेगवेगळ्या कंपनीचा गुटख्याने भरलेल्या गोण्या मिळून आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून जप्त केलेला गुटखा हा पोलीस ठाण्याच्या एका खोलीत सुरक्षित ठेवला होता. परंतु, काही कालावधीने या गुटखाच्या गोण्या खोलीतून काढून पोलीस ठाण्याच्या आवारात उघड्यावर ठेवण्यात आल्या. उघड्यावर ठेवण्यात आलेल्या या गोण्या रात्रीच्या सुमारास घुशी आणि उंदराने कुरतडल्यामुळे गोण्यांमधील गुटख्यांची पाकिटे उघड्यावर पडलेली होती. (Mulund Police Station)
(हेही वाचा – Mulund Police Station : घुशींना लागली गुटख्याची तलब, पोलिसांनी जप्त केलेला लाखो रुपयांचा गुटखा उघड्यावर)
गुटख्यांचे पाकिटे रात्रीच्या सुमारास घुशी, उंदीर फस्त करीत आहेत. तर काहीजण ही गुटख्याची पाकिटे चोरी करून घेऊन जात असल्याची शक्यता स्थानिक पोलिसांकडून वर्तवली जात आहे. तीन वर्षे जुना गुटखा त्यात पाऊस आणि उन्हामुळे खराब होऊन त्याचे विषात रूपांतर झाले आहे. उघड्यावर पडलेला गुटखा खाऊन मोठी घटना घडण्याची शक्यता आहे. हे वृत्त २४ जुलै रोजी ‘हिंदुस्थान पोस्ट’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल मुलुंड पोलीस ठाण्याकडून घेण्यात आली आहे. पोलिसांनी हा सर्व गुटखा सुरक्षितस्थळी हलवला आहे, तसेच जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची विल्हेवाट लावण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मागण्यात आली आहे. न्यायालयाची परवानगीचा आदेश मिळताच हा गुटखा नष्ट करण्यात येईल असे अधिकाऱ्याने म्हटले आहे. (Mulund Police Station)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community