Mulund Swimming Pool : मुलुंड स्विमिंग पूलचे होणार नूतनीकरण

अखेर दहा वर्षांच्या पाठपुराव्याला यश

2443
Mulund Swimming Pool : मुलुंड स्विमिंग पूलचे होणार नूतनीकरण

मागील दहा वर्षांपासून नुतनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे अखेर नुतनीकरण करण्याचा निर्णय घेतला असून या कामासाठी आता महापालिका प्रशासनाने निविदा मागवली आहे. या नुतनीकरणाच्या कामांसाठी तब्बल ०८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. (Mulund Swimming Pool)

बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या अखत्यारित येणाऱ्या मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील जलतरण तलाव व गाळणीयंत्र साधारणतः ३८ ते ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. त्यामुळे त्याचे आयुर्मान पूर्ण झाले आहे. जलतरण तलाव आजही सुरु असले तरी पंपांचे आयुर्मान संपल्याने तसेच योग्यप्रकारे दुरुस्ती होत नसल्याने या तरण तलावांमध्ये वारंवार दुरुस्तीची कामे निघत आहेत. त्यामुळे पंपांमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने जलतरण तलाव (Mulund Swimming Pool) बंद ठेवण्याची वेळ येते. त्यामुळे जलतरण तलावाची दुरुस्ती, तसेच कालिदास नाट्यगृहाच्या आवारातील शुध्दीकरण केंद्राचे नुतनीकरण आदी प्रकारची कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे सिव्हीलची सुमारे सहा कोटींची आणि विद्युतची सुमारे २ कोटींची अशाप्रकारे सुमारे ८ कोटींची कामे अंदाजित आहे. (Mulund Swimming Pool)

गेल्या दहा वर्षाच्या पाठपुराव्यानंतर प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल जलतरण तलावाच्या नूतनीकरणाची निविदा आता काढण्यात आलेली आहे. गेली दहा वर्षे महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये दरवर्षी तरतूद करण्यात येत होती. परंतु या जलतरण तलावाची दुरुस्ती तसेच नुतनीकरणाची कामे करण्यात येत नव्हती. त्यामुळे तरतूद केलेला निधी वाया जात होता. त्यामुळे या जलतरण तलावाचे (Mulund Swimming Pool) काम न करणारे झारीतील काही शुक्राचार्य कोण आहेत असा सवाल सभासदांकडून केला जात आहे. याबाबत स्थानिक आमदार मिहीर कोटेचा यांनी वारंवार विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता, त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. स्थानिक आमदार मिहीर कोटेचा, स्थानिक खासदार मनोज कोटक आणि आणि शिवसेनेचे संसदेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या अथक प्रयत्नानंतर ही निविदा काढण्यात आलेली आहे. इमारत परिरक्षण विभागातर्फे जलतरण तलाव दुरुस्तीच्या कामाची निविदा आता काढण्यात आलेली आहे. (Mulund Swimming Pool)

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाचा पहिला सामना न्यूझीलंडशी)

मुलुंड जलतरण तलाव एक महिन्यांसाठी ठेवले होते बंद

मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील जलतरण तलावाच्या (Mulund Swimming Pool) गाळणी यंत्राची दुरुस्ती तसेच तलावातील पाण्याचा दर्जा सुधारण्याची कामे हाती घेण्यात आली होती. त्यामुळे हा जलतरण तलाव १६ ऑगस्ट २०२३ पासून बंद ठेवण्यात आला आहे. तसेच, ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत ही कामे पूर्ण करुन हा तलाव पुन्हा खुला करण्यात आला होता. काळानुरुप होत असलेली झीज लक्षात घेता या तलावाच्या गाळणीयंत्राचे अनेक भाग दुरुस्त करुन ते अद्यावत करण्यासाठी व फिल्टरेशन मीडिया म्हणजेच गाळणीची वाळू बदलण्याची कामे मागील वर्षी करण्यासाठी हे तरणतलाव एक महिना बंद ठेवण्यात आले होते. (Mulund Swimming Pool)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.