मुंबईत AC Localचे स्वयंचलित दरवाजे (Ac local Doors) जर स्टेशनवर उघडलेच नाहीत, तर काय करायचे? असा प्रश्न आता प्रवाशांना पडू लागला आहे. कारण गेल्या 15 दिवसांत सलग दुस-यांदा स्टेशनवर दरवाजे उघडले नाहीत. नेहमीप्रमाणे दादरला उतरायचं म्हणून प्रवासी सज्ज होते, पण एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाहीत. त्यामुळे आधीच उशीर झालेल्या प्रवाशांना आणखी उशीर झाला. कल्याण- सीएसएमटी 6:32 ची लोकल दादर स्थानकात आल्यानंतर तिचे दरवाजे उघडले न गेल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.
आणि दादरला एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाहीत! #MumbaiAcLocal #ACLocal #Mumbai pic.twitter.com/4iZe073xzd
— Siddhesh Sawant (@ssidsawant) July 12, 2022
याआधीही घडलाय असा प्रकार
27 जूनला सकाळी 9:03 मिनिटांची ठाणे- सीएसएमटी एसी लोकल निघाली होती. लोकलला अपेक्षेप्रमाणे जास्त प्रवासी होते. गारेगारे प्रवास सुरु झाला. ठाणे ते मस्जिद बंदरपर्यंत सगळा प्रवास सुरळीत झाला. आता सीएसएमटी स्थानक येणार म्हणून प्रवासी दरवाजापाशी येऊन उभे राहिले. गाडी स्थानकात पोहोचली पण दरवाजे काही उघडलेच नाहीत. आता दरवाजे का उघडले नाहीत? हे कळायला काही मार्ग नव्हता. लोकल स्थानकात आल्यानंतर, मोटरमन खाली उतरले आणि चालू लागले. पण थोड्याच वेळात त्यांना घडलेला प्रकार लक्षात आला आणि पुन्हा येऊन त्यांनी अखेर लोकलचे दरवाजे उघडले.
( हेही वाचा JEE Main Result 2022: JEE Mains चा निकाल जाहीर; जाणून घ्या टक्केवारीनुसार, कुठे मिळू शकेल प्रवेश )
Join Our WhatsApp Community