Mumbai Local : प्रवाशांसाठी खुशखबर! AC लोकलचा प्रवास होणार आणखी स्वस्त?

मुंबईकरांना रेल्वेकडून लवकरच एक मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. एसी लोकलला मिळणारा अल्प प्रतिसाद पाहून सरकारने मे २०२२ मध्ये एसी लोकलचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता यानंतर एसी लोकलच्या प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन आता एसी गाड्यांच्या वाढीव फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु लोकल प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी असून मुंबईतील एसी लोकलचे एकेरी प्रवासाचे भाडे कमी करावे असा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने दिला आहे. मुंबईत धावणाऱ्या मेट्रो ट्रेनच्या भाडे दरांच्या आधारे हे एसी लोकलचे दर निश्चित करावेत असे रेल्वे बोर्डाने म्हटले आहे.

( हेही वाचा : IRCTC New Plan : स्वस्त मस्त रेल्वे! आता जेवणासाठी नका देऊ जास्तीचे पैसे, पहा संपूर्ण दरपत्रक)

एसी लोकलचे भाडे कमी करून एसी लोकलची वारंवारताही वाढवावी लागणार आहे. एसी गाड्यांची संथ्या सध्या मर्यादित असल्यामुळे अनेक लोक मासिक पास काढत नाही, म्हणून वाढीव फेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे.

तिकीट कमी होणार? 

रेल्वे बोर्डाचा हा प्रस्ताव मंजूर झाल्यास मुंबईकरांना एसीमध्ये प्रवास करण्यासाठी 10 ते 80 रुपये मोजावे लागू शकतात. म्हणजेच तिकीट दरात मोठी कपात होणार आहे. सध्या प्रवाशांना 65 ते 220 रुपयांपर्यंत भाडे द्यावे लागते. मुंबई रेल्वे विकास महामंडळ लवकरच २३८ एसी गाड्यांसाठी निविदा काढणार आहे.

सध्याचे तिकीट दर

  • 5 किमी – 65 रुपये
  • 10 किमी – 65 रुपये
  • 15 किमी – 90 रुपये
  • 20 किमी – 135 रुपये
  • 25 किमी – 135 रुपये
  • 30 किमी – 175 रुपये
  • 35 किमी – 180 रुपये
  • 40 किमी – 190 रुपये
  • 55 किमी – 205 रुपये
  • 65 किमी – 220 रुपये

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here