मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीनशेच्या खाली उतरली असून सोमवारी दिवसभरात २५९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ३९१ रुग्ण बरे होवून घरी परतले. तर सोमवारपर्यंत विविध ठिकाणी ४ हजार ७४४ कोविड रुग्णांवर उपचार सुरु आहे.
९ रुग्णांचा मृत्यू झाला
रविवारी जिथे ३३१ नवीन रुग्ण आढळून आले होते, तिथे सोमवारी २५९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात ०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये ०९ रुग्ण हे दीर्घकालिन आजारांचे होते. तर यामध्ये ५ पुरुष आणि ४ महिला रुग्णांचा समावेश होता. यामध्ये एका मृत रुग्णांचे वय हे चाळीशीच्या आतमध्ये आहे. तर ६ रुग्णांचे वय हे ६० वर्षांच्या पुढील आहे. २ रुग्ण हे ४० ते ६० वर्ष वयोगटातील आहे.
(हेही वाचा : वाहतूक विभागाचा ‘हा’ खर्च मुंबई महापालिका उचलते)
रुग्ण दुप्पट होण्याचा दर हा १५०० दिवस एवढा आहे!
मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा ९७ टक्के एवढा आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा दर हा १५०० दिवस एवढा आहे. तर सक्रिय कंटेन्मेंट झोन असलेल्या झोपडपट्टी व चाळींची संख्या ३ एवढी आहे, तर इमारतींची संख्या ४६ एवढी आहे
Join Our WhatsApp Community