मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विशेष उपाययोजना; सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर प्रशासन सतर्क

136

प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे कार अपघातात निधन झाले. या पार्श्वभूमीवर मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. महामार्ग प्राधिकरणाने अपघात झालेल्या घटनास्थळावर क्रॅश कुशन बसवण्यास सुरुवात केली आहे. अछाड ते घोडबंदरपर्यंत २९ ब्लॅक स्पॉट असून अशा ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवणे, सूचना देणारे फलक लावणे अशा पद्धतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. या महामार्गावर प्रथमच अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

( हेही वाचा : श्रीवल्ली ते कच्चा बादाम… २०२२ मध्ये ‘या’ व्हिडिओंनी गाजवलं Youtube, गुगलने जारी केली यादी)

क्रॅश कुशन सुविधा 

प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्री यांचा वयाच्या ५४ व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला. सायरस मिस्त्री अहमदाबादवरून मुंबईला येत असताना पालघरमधील चारोटी येथे हा अपघात झाला होता. मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूला ३ महिने झाल्यावर प्रशासनाने आता उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. अपघात झालेल्या घटनास्थळी महामार्ग प्राधिकरणाने क्रॅश कुशन (Crash Cushion) बसवण्यास सुरूवात केली आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सूर्या नदीवरील पुलाजवळ रस्ता अरूंद होतो. त्यामुळे चालकांना अडचणी येतात. यासोबतच रस्त्यावर अचानक येणारा दुभाजक अडथळा ठरतो. मिस्त्री यांची कार याच दुभाजकावर आदळली. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने क्रॅश कुशन लावले आहेत. मिस्त्री यांच्या कारने वेगमर्यादा ओलांडल्यामुळे कार चालकाविरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.