सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही देशात ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी दिसून आली. त्यामुळे आधीच खराब असलेल्या (Mumbai Air Pollution) हवेमध्ये फटाक्यांच्या धुराने भर घातली आणि मुंबईतील प्रदूषण पातळी अत्यंत वाईट स्तरावर पोहोचली.
दरम्यान दिवाळीपूर्वी पडलेल्या पावसामुळे मुंबईची (Mumbai Air Pollution) हवा समाधानकारक नोंदविण्यात आली होती. फटाक्यांच्या धुरांनी मुंबईला पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात ओढले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाऊबिजेच्या दिवशी मुंबईत ठिकठिकाणी हवेच्या गुणवत्तेची पातळी वाईट नोंदविण्यात आली असून, यात प्रकाश प्रदूषणानेही भर घातली आहे.लक्ष्मी पूजनाला मुंबईकरांना (Mumbai Air Pollution) रात्री १२ वाजेपर्यंत फटाक्यांची आतिषबाजी केली होती.
(हेही वाचा – Heat Wave : मागील वर्षभरापासूनच्या काळात पृथ्वीवर नोंदवले सर्वाधिक तापमान)
पाडव्याला फटाके वाजविण्याचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी भाऊबीजेला (Mumbai Air Pollution) नोंदविण्यात आलेली हवा अत्यंत वाईट या श्रेणीत मोजली गेली.
लक्ष्मीपूजनच्या तुलनेत पाडव्याला मात्र फटाके (Mumbai Air Pollution) वाजविण्याचे प्रमाण कमी होते. लक्ष्मीपूजनाला रात्री ७ वाजल्यापासून ११.३० वाजेपर्यंत आतिषबाजी करणारे आणि कानठाळ्या बसविणारे सुतळी बॉम्ब मोठ्या प्रमाणावर वाजविण्यात आले. तर पाडव्याला रात्री ७ वाजल्यापासून १० वाजेपर्यंत बहुतांशी ठिकाणी फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी होते. (Mumbai Air Pollution)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community