गेल्या काही दिवसांत थंडी जोर धरत असल्यामुळे मुंबई आणि पुण्याची हवा बिघडली आहे. प्रदूषणात वाढ झाल्याने पुढील दोन दिवसांत मुंबईतील हवा अतिधोकादायक, तर पुण्याची हवा धोकादायक पातळीवर राहण्याची शक्यता आहे.
भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेअंतर्गत असलेल्या सफर प्रणालीकडून हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक आणि हवेच्या गुणवत्तेचा अंदाज दिला जातो. त्यानुसार, हवेच्या गुणवत्तेचे चांगली, समाधानकारक, सामन्य, धोकादायक, अतिधोकादायक असे निष्कर्ष निश्चित करण्यात आले आहेत. या निकषांनुसार, मुंबई आणि पुण्याची हवा बिघडल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसांत थंडी वाढल्यामुळे या दोन्ही शहरातील प्रदूषणातही वाढ झाली आहे. प्रदूषण काही धूलिकणांचे प्रमाण वाढून हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत पुण्याची हवा धोकादायक आणि मुंबईची हवा अतिधोकादायक पातळीवर राहण्याचा अंदाज आहे.
मुंबईतील कुलाबा, माझगाव, अंधेरी, चेंबूर, मालाड, नवी मुंबई, येथील हवेची गुणवत्ता अतिधोकादायक, तर भांडूप परिसरातील हवा धोकादायक पातळीवर असू शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
( हेही वाचा: कवाडेंना सोबत घेताना मला विचारायला हवे होते; आठवलेंचा मुख्यमंत्र्यांवर आक्षेप )
काळजी घेणे आवश्यक
खालावलेली गुणवत्ता आरोग्यासाठी त्रासदायक ठरु शकते. त्यात श्वास घेण्यात त्रास, थकवा जाणवतो असे प्रकार होऊ शकतात. त्यातही विशेषत: अस्थमाच्या रुग्णांना श्वास घेण्यास अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे शारिरिक परिश्रमाची कामे टाळावीर, जास्त वेळ बाहेर राहणे टाळावे, सतत खोकला येऊ लागल्यास, श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यास त्वरित औषधं घेण्याचे, डाॅक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community